महाराष्ट्र विद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रम

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


बार्शी, प्रतिनिधी दिनांक:- 2 सप्टेंबर 2023 रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या सीमेवरील जवानांना,डॉ.एम. एस.बेग हैदराबाद (सामाजिक कार्यकर्ता) व रा.रा.पोलीस.बल.गट क्र.१० सोलापूर (ई- कंपनी) यांना पाठविल्या.समाजाचे आपण काहीतरी देणं असतो या उक्तीप्रमाणे स्व-कौशल्य जागृत करून अप्रतिम राख्या तयार केल्या.या विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासाठी श्रीमती सुहासिनी शिंदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच राखी मिळताच जवानांनी व डॉ. एम.एस. बेग यांनी विद्यार्थिनींना खाऊ देऊन बंधू प्रेमाचा सन्मान बहिणीस दिला.
भारतीय संस्कृतीमधील प्रेमळ,अतूट, पवित्र बहीण भावांचे नाते सुरक्षेच्या बंधनात बांधणारे सन व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सैन्य व पोलीस दलामधे घरापासून दूर कर्तव्य बजावणाऱ्या भावंडानसाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी अवस्मरीन सुंदर असा उपक्रम केला.
डॉ.बेग,पोलीस अधिकारी व जवानांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या सुंदर अशा उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे यांनी श्रीमती सुहासिनी शिंदे व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!