Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा :सराटी अंतरवाली फाटा ( ता. अंबड जि.जालना ) येथे मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषण सुरु असताना मराठा आंदोलकावर लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलीस प्रशासनावर कार्यवाही करण्यात यावी . या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार ( दि. २ ) परंडा तहसिलदार घनश्याम आडसूळ यांना देण्यात आले . यावेळी पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार उपस्थित होते .दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व लाठीचार्ज घटनेचा व राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला . तसेच आरक्षणाची जोरदार मागणी करण्यात आली . यावेळी विविध राजकीय पक्ष , संघटना व पदाधिकारी यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला . तसेच परंडा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता बससेवा ठप्प होती . यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता .
मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , शुक्रवार दि . १ रोजी सराटी अंतरवाली फाटा ता. अंबड जि. जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनातील मराठा समाजातील महिला, मुले, तरूण तसेच वृध्द आंदोलकावर संबंधित पोलीस यंत्रणेने बेछुट व अमानुष लाठीचार्ज करून अनेक आंदोलकांना गंभीर जखमी केले व नाहक हवेत गोळीबार करून मराठा समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आंदोलकावर बेछुट लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित यंत्रणेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!