जालन्यातील पोलिसांकडून घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बार्शीतील मराठा समाज आक्रमक

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

जालना येथे मराठा समाजाचे शांततेत असलेले आंदोलन सरकारने चीरडून काढण्याचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत लाठी चार्ज करून केला, ज्यामध्ये मराठा समाजातील अनेक महिलां, पुरुष तरुण युवक, गंभीरित्या जखमी झाले याचा निषेध म्हणून मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी तहसील कार्यालय मोर्चा काढत निषेध व्यक्त केला.
यावेळी मराठा समाजाचे आनंद काशीद शांत असणारा मराठा समाजाला सरकारने खवळण्याचा प्रयत्न करू नये सरकारला ते महागात पडेल कारण मराठा समाजाने आतापर्यंत लाखोंच्या संख्येने 58 मोर्चे शांततेमध्ये काढले आहेत कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू दिली नाही, पण सरकारने जर मराठा समाजावरती असा अन्याय अत्याचार करायचा ठरवला असेल तर मराठा समाज जशास तसे उत्तर देईल. राज्याचे गृहमंत्री उलट मराठा समाजावरतीच मराठ्यांनी सर्वप्रथम दगडफेक केली असा आरोप करून मराठा समाजास बदनाम करत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वप्रथम मराठ्यांनी दगडफेक केलेला व्हिडिओ दाखवावा नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ही देखील मराठा समाजाची मागणी आहे हे बोलत असताना ते पुढे म्हणाले मराठा समाजातील शिक्षण घेत असणाऱ्या मुलांनी मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनामध्ये भाग घेऊ नये कारण भविष्यातील तुम्ही अधिकारी आहात तुमचं कोणतही नुकसान होऊ नये ही मराठा समाजाचे प्रमाणिक भावना आहे.

वरील व्हिडिओ क्लिक करून पहा बार्शी येथील मराठा समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य निषेध भव्य मोर्चा LIVE….

आरक्षणाचा लढा हा आणि तुमच्यासाठी लढतोत ज्या वेळेस तुम्हाला आरक्षण मिळेल त्यावेळेस या आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे त्यामुळे आक्रमक आंदोलनामध्ये तुम्ही न येता आम्ही मराठा समाजाचे कार्यकरते त्यासाठी समर्थ आहोत असे आव्हान देखील मराठा समाजातील युवकांना यावेळी आनंद काशीद यांनी केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत असताना म्हणाले मराठा समाजाची यापूर्वी अनेकांनी फसवणूक केली पण या पुढील काळात मराठा समाज फसणार नाही कारण मराठा समाजाची कोर्टात टिकणार मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाची मागणी समाज एकमुखाने करत आहे ती लवकरात लवकर सरकारने मान्य करावी अशे आव्हान त्यांनी राज्य सरकारला केले.
सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला फसवले आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचा निषेध व्यक्त करत विजय राऊत यांनी आपला निषेध नोंदवला.
तर वकील संघाच्या वतीने एडवोकेट पद्माकर कटमोरे यांनी मराठा समाजाचा अंत हे सरकार पाहत आहे मराठा समाजाचा अंत सूटला तर सरकारचा अंत होईल अशा शब्दात त्यांनी सरकार वरती टीका केली.
आम्ही नेहमीच राजकारणाचे जोडे बाहेर सोडून मराठा समाजासाठी लढलो आहोत या पुढील काळात देखील लढू व मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी करून दाखवू अशा शब्दात विश्वास भाऊ बारबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी एडवोकेट विकास जाधव कपिल कोरके शुभम चव्हाण आदींची मनोगते झाली तर यावेळी वैरागचे मकरंद निंबाळकर शोभाताई कुठे राजश्री डांबरे सुवर्णा शिवपुरे यांच्यासह शेकडो मराठा समाजबांधव उपस्थितत होते.

मराठा समाजातील तरुण व पुरुषावरती पोलिसांच्या वतीने सरकारने हल्ला केला असता तरी मराठे गप्प बसले असते पण मराठा समाजातील महिलांवर त्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे दिनांक 4 सप्टेंबर वार सोमवार रोजी वैराग बार्शी सह तालुका बंद ठेवण्याचा आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!