संपूर्ण भाजपाई ‘इंडिया’ बैठकीमुळे घाबरून सैरभैर झाली आहे.

Picture of starmazanews

starmazanews

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे.


स्टार माझा न्यूज पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- तुकाराम नगर दि‌३१ ऑगस्ट २०२३
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘उद्धवश्री’ पुरस्कार समारंभ २०२३ आणि राज्यश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती योजनेच्या लाभ धारकांना धनादेश वाटपाचा सोहळा सुषमा अंधारे यांच्या हातचे पार पडला. यावेळी अंधारे बोलत होत्या भाजपा विरोधात २८ पक्ष एकत्र आले आहेत. यातील सगळे पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी टिकणार नाही अशी टीका भाजप व त्यांनी नेमलेले कंत्राटदार करत आहेत. मात्र, इंडियाकडे एकशे बढकर एक पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. तेवढ्या ताकतीचे आणि शिकलेले ते आहेत मात्र, गेली ९ वर्षे झाली भाजपाकडे पंतप्रधान म्हणून एकच व्यक्ती आहे. त्यांच्याकडे एकाशिवाय पर्याय आहे का? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला पिंपरीमध्ये उद्धवश्री पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्यावेळी अंधारे बोलत होत्या. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनिस ,शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार गौतम चाबुस्कर, वैद्यकीय डॉ. राजेंद्र वाबळ, सामाजिक सेवा तय्यब शेख, अभिनेत्री माधुरी पवार,आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य विनोद पाटील, वारकरी संप्रदाय पंडित रघुनाथ खंडाळकर, क्रीडा क्षेत्र भारत आव्हाड, आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रवीण बडे, नृत्यकला ऐश्वर्या काळे, क्रीडा मदन कोठुळे, सिने अभिनेते माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले, पत्रकार प्रसन्न तरडे, आदर्श कामगार काळूराम लांडगे, सिने बालकलाकार टिफिन टाईम प्रज्ञा फडतरे, अभिजीत गोफन आदी उपस्थित होते. राजकारणात धर्म आणला जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची गरज आहे. शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंवर टीका झाली त्यात भाजपाने सुपारी दिलेल्या राणे, राणा कंत्राटदार आघाडीवर आहेत मी निलेश आणि नितेश राणे बद्दल बोलणार नाही. त्यांच्यात संस्कार नावाच्या विटामिनची कमतरता आहे राणांना उद्धव ठाकरे यांचा दम पाहिजे इच्छा झाली. सगळी भाजपातील नेतेमंडळी इंडियातील २८ पक्षापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे मध्ये किती दम आहे. हे सिद्ध झाले आहे. त्यांच्या कपटी राजकारणाला शहा यांचा शह आहे. अंधारे म्हणाल्या फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कपटी राजकारण केले. त्यामुळे त्यांचा कार्यकाल हा कपटी मुख्यमंत्री म्हणून ओळखला जाईल अमित शहा यांनी अजित पवार सोबत घेत फडणवीस यांच्या कपटी राजकारणाला शह दिला आहे. त्यामुळे फडणवीस यांचे राजकारण संपुष्टात आले असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!