गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी
मंत्र्यांची उपस्थिती.
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
संभाजीनगर,प्रतिनिधी,आजचा हा काळ स्पर्धाचा असून कठोर परिश्रम जिद्दीच्या बळावर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो आपण शालेय जीवनामध्ये यश मिळवलं आहे परंतू आता खऱ्या अर्थाने आपली परीक्षा असून आता आपणाला चांगल्या पदावर जाण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवायचे आहे.
तेली समाजाचे नेते गणेश पवार यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे नुकताच राज्यस्तरीय तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुढे बोलतांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड आपल्या भाषणात म्हणाले की कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्या करिता विद्यार्थ्यांनी ध्येय आणि जिद्द समोर ठेवून अभ्यास करावा असे बोलून त्यांनी केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
मेहनत,जिद्द आणि अथक परिश्रमाच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणे आपले कर्तव्य आहे. यशाची एक-एक पायरी चढताना संतांचा विचार मागे पडता कामा नये हे संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वात रुजविणे गरजेचे आहे सहकार व ओबीसी समाज कल्याण मंत्री ना.अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेच
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव भूषण कर्डिले यांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे अशी लक्षवेधी मागणी करून तसेच ओबीसींच्या अनेक विषयावर आपले विचार व्यक्त करून त्यांनी ओबीसींचे अनेक प्रश्न लक्षात आणून देऊन ते सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती मंत्री महोदयांना केली.
आर्थिक परिस्थिती अभावी गुणवंतांचे स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून गरुड झेप करियर अकॅडमीच्या माध्यमातून त्यांना योग्य ती मदत केली जाईल गरूडझेप अकॅडमी विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष निलेश सोनवणेसर म्हणाले,
प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदरिल कार्यक्रमाला जवळपास दीडशे विद्यार्थ्यांची उपस्थिती होती अनेक विद्यार्थ्यांनी मंचावर येऊन आपले अनुभव सांगून परिचय दिला.
कर्मयोगी समाज सेवक कै.पांडुरंग फकीरचंद मिटकर यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह देऊन गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड,सहकार व बहुजन समाज कल्याण मंत्री अतुल सावे, शिवसेना नेते तथा माजी चंद्रकांत खैरे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव,डॉ.भूषण कर्डिले,कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार,राज्य समन्वयक सुनिल चौधरी, विभागीय अध्यक्ष निलेश सोनवणे,तेलीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेशप्रसाद,नाशिकचे समाज सेवक सचिन शिंदे,सोपान पेंढारकर,जेष्ठ समाज सेवक कूष्णा ठोंबरे,अनिल मकरिये,कूष्णा सोनवणे,गणेश वाडेकर,विठ्ठल रणबावरे,भगवान गायकवाड,शालिनी बुंदे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
श्रीराम कोरडे,सुनिल क्षीरसागर,विजय गायकवाड,सुभाष वाळके,किरण पन्हाळे,सुनिल क्षीरसागर,भगवान गायकवाड,अनिल क्षीरसागर,लक्षम राऊत,श्रीकूष्ण ढोंबळे,भिकन राऊत,कपिलदेव राऊत,दत्त भोलाने,विनोद मिसाळ,पांडूरंग चोथे,रंजना बागूल,अर्चना फिरके,गायत्री चौधरी,दिपाली वाळके,अक्षय वाघलव्हाळे,जगदिश नांदरकर,विशाल नांदरकर,
विजय देशमाने,रंजना अंबेकर,रंजना वेळंजकर,सुनंदा अबोले,छाया वाळके,लंका सोनवणे,कूष्णा सोनवणे,कचरू वेळंजकर राजेश शिंदे,डॉ.विजय दळवी,डॉ.लक्ष्मीकांत क्षीरसागर,
हरीभाऊ संतांसे,कूष्णा ठोंबरे,अशोक चौधरी,विश्वनाथ गवळी,कचरदास राऊत,भारत कसबेकर,नारायण दळवे,ज्ञानेश प्रसाद,गणेश वाडेकर,भगवान मिटकर आदींनी सहकार्य करून परिश्रम घेतले.
प्रास्ताविक श्री कचरू वेळंजकर यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.लंकाताई कूष्णा सोनवणे,हर्षल व्यवहारे
सचिन अंभोरे यांनी केले व
आभार जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांनी मानले.
विभागीय अध्यक्ष निलेश सोनवणे सर यांचाही या प्रसंगी वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच जालना येथील सोपान पेंढारकर यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
उत्साही वातावरणामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.