३१ ऑगस्ट रोजी भूम येथे शेतकरी पुत्रांचा आक्रोश मोर्चा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने चलो भुम ! चलो भुम !! चलो भुम !!!
शेतकरी पुत्र आक्रोश मोर्चा भुम परंडा वाशी
दिनांक ३१/०८/२०२३
स्थळ – उप जिल्हा अधिकारी कार्यालय, भुम

प्रमुख मागण्या !!

१. २५ दिवसांपासून खंड पडलेला असतान देखील पिकविमा २०२३ साठी २५% अग्रीम रक्कम वाटप यातून वगळलेल्या भुम परंडा वाशी तालुक्यातील सर्व मंडळाना तात्काळ सामाविष्ठ करणेबाबत
२. पावसाअभावी सुखलेल्या पिकांचे तात्काळ सर्वे/पंचनामे करणेबाबत.
३. तीन्ही तालुक्यातील २०२२ च्या सततच्या पावसाने झालेल्या नुकसानभरपाई चे वितरण करणेबाबत.
४. पिकविमा २०२० चे तीन्ही तालुक्यात तात्काळ वाटप
५. भुम परंडा वाशी या तीन्ही तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करणेबाबत.
६. दरवेळी मंडळातील पावसाच्या चुकिच्या नोंदी घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणेबाबत.


शेतकऱ्यांचा माहीतीसाठी

ट्रिगर अंतर्गत एखाद्या मंडळात सलग २१ दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यास २५ % अग्रीम रक्कम भरपाईची तरतुद आहे. भुम परंडा वाशी या तीन्ही तालुक्यात सर्वत्रच गेल्या २५ दिवसांपासून पाऊसाचा खंड असताना देखील, निम्मा पेक्षा जास्त मंडळाचा सामावेश अग्रीम रक्कम वाटपात नाही. त्यामुळे आपल्या हक्काचा पिकविमासाठी सर्व शेतकरी बांधवानी आंदोलनात सहभागी होऊन, तहसिलदार, उप जिल्हा अधिकारी भुम यांना महसूल व कृषी विभागातील अधिकारी यांनी चुकिचा अहवाल का दिला व हक्काचा अनुदानासाठी तुमच्या कार्यलयात शेतकऱ्यांनी किती दिवस हेलपाटे मारायचे, असा जाब विचारण्यासाठी व आपल्या मागण्या मंजूर करूण घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे.

आयोजक –
सर्व शेतकरी व शेतकरी पुत्र भुम परंडा वाशी

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!