पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि. २९ ऑगस्ट २०२३ पिंपरी चिंचवड शहराची ओळख “कामगारनगरी” अशी आहे त्यामुळे १९८५ पासून प्रलंबित असलेल्या कामगार भवनाच्या कामाला जालना देण्यात येईल. मोरवाडी येथे महापालिका प्रशासनाने दिलेल्या सुमारे पाच एकर भूखंडावर भव्य कामगार भवन उभारण्यात येईल असे, आश्वासन राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले. कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उद्योग नगरी पिंपरी चिंचवड चा दौरा केला. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ संभाजीनगर येथे संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या समावेत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, माजी सत्ता रोड पक्षनेते नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा निवडणूक अमित गोरखे, माजी महापौर तुषार हिंगे, केशव घोळावे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडगिरी, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, चिंचवड विधानसभेचे प्रमुख काळुराम बारणे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, युवा मोर्चा सचिव तेजस्विनी कदम, माजी नगरसेवक उत्तमराव केंदळे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सरचिटणीस राजू दुर्गे, कामगार कल्याण मंडळाच्या माजी संचालिका भारती चव्हाण आदी उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.