पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:- दि.२९ ऑगस्ट २०२३ कर्नाटकातून आलेले पाच हजार किलोमीटर पनीर जप्त. कर्नाटकातून पुणे शहरात विक्रीसाठी पाठवण्यात आलेले ४९७० किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आला आहे. कात्रज चौकात गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सहकार्य केले. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीर विक्रीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. कात्रज चौकात पनीर वाहतूक करणारा टेम्पो थांबिवली ची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. टेम्पोतून दहा लाख रुपयाचे ४९७० किलो पनीर जप्त करण्यात आले. अन्नसुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनाही माहिती कळविण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार भेसळुक्त पनीर बाणेर येथील नॅशनल एग्रीकल्चर अँड फूड ॲनलसिस ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी पनीर भेसळीत असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शहीद शेख, सुमित ताकपेरे, महेश पाटील, आदींनीही कारवाई केली आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.