पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:- दि.२९ ऑगस्ट २०२३पुणे राज्य सरकार मार्फत कसबा विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा करिता १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र तो निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघांमध्ये वळविण्यात आला आहे. यामागे भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी लवकरात लवकर १० कोटींचा निधी न दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर एक दिवशीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिला. आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, कसबा विधानसभा पोटनिवडणूक होऊन जवळपास सात महिन्यांचा कालावधी होऊन गेला त्या काळात मी राज्य सरकारकडे जवळपास १०० कामे सुचवली होती त्यासाठी द१० कोटींचा निधीदेखील मंजूर झाला होता पण, अचानकपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी पर्वती विधानसभा मतदारसंघात वळविल्याची माहिती समोर आली आहे. या कृती मधून भाजपच्या नेत्याकडून कुरगुडीचे राजकारण सुरू आहे. या कृतीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. तुम्ही माझा अपमान करा तो मी अपमान सहन करेल पण मी माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा अपमान सहन करणार नाही. त्यावेळी शहरातील ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील कार्यक्रमासाठी जातील त्या ठिकाणी मी आंदोलन करून जाब विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.