स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा, ता २६ ऑगस्ट आगामी काळातील सर्व धर्मीयांच्या सण, उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखुन शांततेत उत्सव साजरे करावेत,कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीसांच्यावतीने शनिवारी ता.२६ रोजी ऐतिहासिक परंडा शहरातील प्रमुख मार्गासह गल्लोगल्लीतुन रॕपिड एॕक्शन फोर्ससह पोलीसांनी पथसंचलन केले.
आगामी काळात सण उत्सव साजरे होत आहेत.या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ,पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली रॕपिड एॕक्शन फोर्स, दंगल विरोधी पथक, पोलीसांचा रुट मार्च काढण्यात आला.ऐतिहासिक असलेल्या परंडा शहरात सण उत्सवकाळात सामाजिक सलोखा कायम राहुन शांततेत सण साजरे करावे.सर्वधर्म समभावाचा एकोपा ठेवुन कायदा व सुव्यवस्था अबादित राखावी.कायद्याचे पालन व्हावे.सण उत्सव काळात कायद्याचे उल्लंघन करुनशांततेचा भंग करणाऱ्याला चाफ बसुन संदेश जावा.यासाठी पथसंचलन करण्यात आले.या पथसंचलनात रॕपिड एॕक्शन फोर्सचे डिप्टी कमांडट विरेंद्रकुमार यादव (९९बीएन.आरएएफ),सपोनि शंकर सुर्वे, सपोनि कविता मुसळे आदिसह पोलीस सहभागी होते. शहरातील प्रमुख मार्गावर पथसंचलन सुरु असताना शहरवासियांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.