परंडा तालुक्यात गणित (मॅथ्स) जीनियस ऑलंपियाड स्पर्धेचे आयोजन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी(दि: 28)
परंडा तालुक्यात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ एक पणजीकृत स्वयं शिक्षण संस्था मंडळ आयोजित गणित ऑलंपियाड स्पर्धेचे आयोजन परंडा शहरातील ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट च्या वतीने करण्यात येत आहे. तरी परंडा तालुक्यातील सर्व इयत्ता १ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यामध्ये शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या विविध विषयांपैकी गणित हा एक सर्वात महत्त्वाचा तर्कशास्त्रीय विषय असून चांगले गणित असणाऱ्या मुलांची बुद्धिमत्ता ही तीव्र चांगली असते हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे त्यामुळे गणित विषयाचा संबंध थेट ब्रेन डेव्हलपमेंटशी होतो मानवी मेंदूची वाढ साधारणता 14 वर्षापर्यंत होत असते या वया पर्यंत मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट गणित विविध ऍक्टिव्हिटीज द्वारे होऊ शकते गणितासारख्या महत्वपूर्ण बुद्धिवर्धक विषयाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी तसेच गणिताची भीती नष्ट होऊन तो एक आनंदाने विषय व्हावा या हेतूने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ या आमच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, इत्यादी राज्यामध्ये आम्ही शालेय स्तरीय मॅथ्स जीनियस ऑलंपियाड या एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत आहोत सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा या हेतूने ना नफा ना तोटा या तत्त्वावर नाममात्र 50₹ (पन्नास रुपये) शुल्क आकारले जाणारा असून हे या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे सदर स्पर्धे परीक्षेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात प्रत्येक येथे मधून पाच विनर काढले जातील बक्षीस स्वरूपात त्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रांझ मिडल, कॉपर मेडल दिले जाते तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाऊन स्पर्धात्मक व आत्मविश्वास वाढविणे हा या मुख्य बक्षिसांचा उद्देश आहे अशा या गणित विषयाची गोडी निर्माण करणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग आपण नोंदवाल व एक सक्षम तसेच बुद्धी बलशाली भारत घडविण्याच्या आमच्या प्रयत्नात सहभागी व्हाल हीच सदिच्छा.
स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे अंतिम दिनांक 05 सप्टेंबर 2023
अधिक माहितीसाठी
डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परांडा 8308118788

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!