www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा दि . २७ : – परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथे आसु सज्जाचे कर्तव्यदक्ष तलाठी विशाल खळदकर यांनी शेतकऱ्यांना बोलाऊन आपल्या शिवारातील ई – पीक पाहणीचे महत्व सांगण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली . या कार्यक्रमात सहभागी होऊन गावातील शेतकर्यांनी दक्षता घ्यावी व ई पीक पाहणी काय असते यासाठी माजी सरपंच हनुमंत गायकवाड यांनी संवाद साधला .
या कार्यशाळेत शेतकर्यां समोर आसु सज्जाचे तलाठी यांनी ई पीक पाहणीचे महत्व , त्याची गरज या बदल मार्गदर्शन करून शेतकन्यांनी ई – पीक पाहणी करून घेऊन तसी महसूल खात्याकडे , अर्थात ७ / १२ उतार्याला नोद करून घेण्याचे आव्हान खळदकर यांनी केले . यावर्षी पाऊस जेमतेमच असल्याने शेतकर्यांपुढे संकट उभा राहण्याची भिती असल्याचे सांगून प्रत्येक शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी करून नोंद करून घेण्याचे शेतकन्यांना आव्हान केले . यावेळी माजी सरपंच हनुमंत गायकवाड , कृषीचे देवकर तसेच पिंपळगावचे शेतकरी तुकाराम गंगावणे हजर होते.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.