आरोग्यमंत्री डॉ प्रा तानाजीराव सावंत यांनी स्वीकारले ऋतुजा सरवदे ह्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक पालकत्व.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. धाराशिव जिल्ह्यातील व धाराशिव शहरातील रहिवासी असलेल्या ऋतुजा जालिंदर सरवदे ह्या विद्यार्थीनीची परदेशात एम बी बी एस अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून ऋतुजाला जवळपास 13 लाख रुपय भरण्यासाठी सांगितले एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न व ऋतुजा हिच्या आई वडीलना पडला तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने तिला आर्थिक मदतीची अत्यंत गरज असल्याने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब हे 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त धाराशिव येथे आले असता ऋतुजा व तिचे आई वडील सावंत साहेब यांना भेटाले व आपल्या मुलीची सर्व हकिकत सावंत साहेब यांना सांगितली ऋतुजा हिला 31 आॅगष्ट पर्यंत प्रवेशप्रक्रिया पुर्ण करायला सांगितले होते ऋतुजा हिची आई आशा कर्मचारी म्हणून आरोग्य सेवा म्हणून काम पहात आहेत तर वडील हे निरक्षर ऋतुजाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न केवळ पैशामुळे अडचणीत आले होते हि माहिती महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ प्रा तानाजीराव सावंत साहेब याना समजताच आज रोजी पुणे येथे ऋतुजा व तिचे आई वडील यांना बोलावून ऋतुजा हिचा संपूर्ण खर्चाचे पालकत्व आदरणीय सावंत साहेब यांनी स्वीकारले यामुळे ऋतुजाने डॉक्टर बनुन समाज्याच्या सेवत लवकर रुजु व्हावे अशा शुभेच्छा व‌ आशीर्वाद सावंत साहेब यांनी दिला

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!