आ राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांना यश १२ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी ८ कोटी ५६ लाख मंजूर.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांना यश,तालुक्यातील १२ गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत ८ कोटी ५६ लाख मंजूर..
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बार्शी तालुक्यातील गावांना नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ८ कोटी ५६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे या गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.या योजनेसाठी निधी मिळविण्यात आमदार राजाभाऊ राऊत यांना यश आले आहे.
या योजनेमुळे बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना 55 लिटर दरडोई याप्रमाणे पाणी मिळणार आहे.लवकरच निविदा प्रक्रिया पार पडून कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.अनेक योजनांमध्ये विविध गावे वंचित राहिल्याने त्यांना विविध योजनांचा लाभ मिळू शकला नाही,परंतु आमदार राजाभाऊ राऊत यांनी नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल,या अनुषंगाने सरकारकडून योजना मंजूर करून घेतल्या,आमदार राजाभाऊ राऊत यांनी सतत पाठपुरावा करून सरकारकडून या योजना मंजूर करून घेतल्या,त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाने या योजना मंजूर केल्या आहेत.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या निर्णयानुसार ५ कोटींपर्यंत मर्यादेपर्यंत उत्पन्नाच्या खर्चाच्या निकषात बसणाऱ्या स्वतंत्र व प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन सोलापूर यांनी या योजनेसाठी मंजुरी दिली आहे‌.

या योजनेत आंबेगाव,देवगाव,गौडगाव,हिंगणी(आर), जामगाव(पा),जामगाव(आ),कांदलगाव,कासारी,कव्हे,खडकोणी,पिंपरी(पा),तांदुळवाडी आदी गावांचा समावेश आहे.

आमदार राजाभाऊ राऊत राऊत यांनी बार्शीच्या विकासासाठी आजपर्यंत विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे..

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!