शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे ‘डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या १२पुस्तकांचा लोकार्पण सोहळा’

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

२१ ऑगस्ट २०२३ रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १० व्या स्मृतीदिना निमित्त, अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा बार्शी, श्री. शिवाजी महाविद्यालय मधील RTC Rational Thinking Cell हा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे ‘डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या १२पुस्तकांचा लोकार्पण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य समितीचे सदस्य प्राध्यापक अशोक कदम सर यांनी अंनिस ची भूमिका यावर प्रस्ताविक सादर केले.
त्यानंतर अंनिस अध्यक्ष सौ. दीपाताई सावळे यांनी अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय ? आणि विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन कायआहे ? यातील फरक सांगितला. प्रमुख वक्ते तसेच अंनिस चे उपाध्यक्ष पा.न.निपाणीकर यांनी अंधश्रद्धा निर्माण कशी होते? या विषयावर मार्गर्शन केले. ते म्हणाले की, जेव्हा प्रश्नाचे उत्तर किंवा शंकेचं समाधान होत नाही आणि आपली बुद्धी योग्य आणि अयोग्य यातील फरक शोधू शकत नाही, सत्य – असत्य स्वतः तपासत नाही आणि अशा प्रश्नांची अचूक उत्तरे न मिळाल्याने माणूस फसवे भोंधू बाबा, देव, दैव, नशीब अशा ठिकाणी आपली उत्तरे शोधू लागतो, म्हणजेच काय तर, तो एक आधार शोधतो आणि त्यातच पून्हा स्वतः वाहत जातो. तत्पूर्वी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बी. वाय.यादव, खजिनदार जयकुमार शितोळे सर, सचिव पी. टी.पाटील सर, RTC चे राहुल पालके सर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये २०० च्या वर विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. शेवटी आभारप्रदर्शन अंनिस बार्शी चे कार्याध्यक्ष श्री. उन्मेष पोतदार यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व मुलांना या पुस्तकाच्या प्रत्येकी एक प्रत, याप्रमाणे वाटप करण्यात आल्या. नवीन पिढीने अंधश्रद्धा आणि विज्ञान वादी दृष्टीकोन यातील फरक स्वतः समजून घेऊन, मगच त्याचे अनुकरण करावे, उगीच पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या काही चाली रीती चे अर्थ न समजता अंधानुकरण न करता त्या मध्ये बदलत्या काळानुसार विवेकवाद अनुसरुन यथायोग्य बदल करणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे राज्य सल्लागार प्राध्यापक हेमंत शिंदे सर, बार्शी अंनिस चे सचिव श्री. सुरेश जगदाळे सर व समितीचे इतर सदस्य कांदे सर, स्वप्निल तुपे, जयश्री पोतदार, अनिता घोळवे, विद्या पोतदार हे ही उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!