पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेकडून कचरा संकलन केंद्रासाठी पर्यायी जागेचा शोध

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.२१ऑगस्ट २०२३ मोशीतील प्रस्ताविक कचरा संकलन केंद्रासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.मोशी मधील सिल्व्हर ९ सोसायटीलगत प्रस्ताविक संकलन केंद्राला पर्यायी जागेसाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार, तीन जागेंचा पाहणी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आपल्या सिल्वर ९ सोसायटी जवळ नियोजित कचरा संकलन आणि वितरण केंद्र सुरू करण्याबाबत हालचाली सुरू होते. या पार्श्वभूमीवर चिखली, मोशी, चरोली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. दरम्यान भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांची सोसायटी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली त्यानुसार आमदार लांडगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र नकोच अशी सूचना केली होती.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!