दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दुःख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज:- बच्चू कडू

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- मंगळवार दि२२ऑगस्ट २०२३ दिव्यांगांच्या सर्वेक्षणावर विशेष लक्ष द्या. दिव्यांगांसाठी लवकरच सर्व समावेश धोरण काढण्यात यावा. दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दुःख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे आणि दिव्यांगांचे सर्वेक्षण योग्य रीतीने होईल याची दक्षता घ्यावी. असे आव्हान दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी लवकरच सर्व समावेशक धोरण आणले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. चिंचवड येथील प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते आदी मान्यवर पद अधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!