स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर, येथील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका व कै भाऊसाहेब लिंबराज पाटील सोनारी ता परंडा यांची कन्या डॉ. साधना भाऊसाहेब पाटील (भोसले) यांना इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट) दिल्ली यांच्याकडून दोन वर्षासाठी दिली जाणारी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप प्राप्त झाली आहे.
त्यांनी ,”औरंगाबादमधील कचरा पुनर्वापराचे आर्थिक विश्लेषण” या विषयावर आपला प्रबंध प्रोफेसर डॉ. धनश्री महाजन, अर्थशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. त्यांचे हे संशोधन औरंगाबाद मधील कचरा समस्या सोडविण्यासाठी मोलाचे योगदान ठरेल. त्यांना सदर संशोधनासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट) दिल्ली ने आठ लाखाची शिष्यवृत्ती बहाल केली होती. त्यांच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दादा सोळंके, सचिव सतीश भाऊ चव्हाण, यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
https://youtube.com/@starmazanews9898 ????????????????वरील लिंक ला क्लिक यूट्यूब वरील बातम्या पाहा.
????चॅनल ला सबस्क्राईब करा

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.