स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा तालुक्यातील लोणी येथील सुपूत्र, पुणे न्यायालयातील प्रतिथयश विधीज्ञ आणि सीबीआय चे माजी वकील ॲड. अय्युब पठाण यांनी त्यांचे १० पर्यंतचे माध्यमिक शिक्षण झालेल्या श्री. संत ज्ञानेश्वर विद्यालयातील १० वी च्या परीक्षेत दरवर्षी ८५% व त्याहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपले आजोबा कै. सिराजोद्दीन पठाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येकी रू. ५०००/- देण्याची घोषणा गतवर्षी केली होती. स्वातंत्र्य दिनी १५ ॲागस्ट रोजी २२ विद्यार्थ्यांना बक्षीसाची रक्कम व स्मृतीचिन्ह वितरणाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. आमदार सुजितसिंहजी ठाकूर, प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश भाजपा, यांच्या शुभहस्ते पार पडला.
पुण्यात वास्तव्यास असूनही आपण ज्या गावात जन्मलो, वाढलो आणि ज्या शाळेत शिकलो त्या गावातील शाळा व गावाप्रती असलेला प्रेम, जिव्हाळा जोपासून सामाजिक जाणीवेतून स्तुत्य उपक्रमाबद्दल ॲड. पठाण यांचे अभिनंदन करून ग्रामस्थांच्यावतीने सत्कार केला.
खरतरं पैसा प्रत्येकाकडे असतो साहेब परंतु ते अगदी निस्वार्थी हेतूने समाजासाठी खर्च करायला खुप मोठं मन असावं लागतं जे आज समाजाला त्यांच्या रूपाने दिसून आलं आहे एखाद्या गावाशी आपलं नातं / नाळ,प्रेम,किती घट्ट आहे त्या गावातील शैक्षणिक बाबतीत किती जागरूक आहात हे आज सर्व गावकऱ्यांना दिसून आलं खूप मोजकी लोकं असतात अशी समाजप्रिय आणि आपण एवढ्यात पण थांबले नाहीत त्याच झालं असं आजच्या भाषणात आपले सेवानिवृत्त शिक्षकांनी गावातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या काही खूप महत्वाच्या ज्याची खूप गरज आहे त्या पूर्ण करणेसाठी लोकवर्गणीतून सद्यस्थितीत अश्या बोलूंन दाखवल्या होत्या तर वकील साहेबांनी त्यांच्या भाषणात त्याचं स्वतःच आपल्या गावावर शिक्षणावर किती उदात्त प्रेम आहे हे दिसून आले 1 वर्षाच्या आत लोणी जिल्हा परिषद शाळेसाठी 3 कॉम्प्युटर आणि एक नवीन खोली देयचं आश्वासन देऊन टाकलं..
आदरणीय आयुब वकील साहेबांनी आज लोणी गावातल्या सर्वाचं,तरुणाईचं मन जिंकल आहे त्यांच्या कार्याने सर्वांना प्रेरणा ऊर्जा मिळाली प्रत्येकाने आपल्याला जमेल, झेपेल, तसं सहकार्य करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण त्यानी घालून दिले.. यावेळी लोनि ग्रामपंचायत चे प्रसाशक जोगदंड ग्रामसेवक नंदनावर तसेच ग्रामपंचायत सद्यस्य राजवली तांबोळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुखदेव टोंपे,माझी उपसरपंच विनोद शिंदे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीर चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. अनिकेत काशीद, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार शिक्षकवृंद आणि विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
https://youtube.com/@starmazanews9898
????????????????वरील लिंक वर क्लिक करून स्टार माझा न्यूज यूट्यूब चॅनल वरील बातम्या पहा व सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. ????????????

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.