परंडा भूम वाशी या तिन्ही तालुक्यातील शासकीय व खाजगी अशा १३० विद्यालयामध्ये डिजिटल बोर्ड प्रशिक्षण शिबिराला सुरुवात.

Picture of starmazanews

starmazanews

परंडा भूम वाशी या तिन्ही तालुक्यातील शासकीय व खाजगी अशा १३० विद्यालयामध्ये डिजिटल बोर्ड प्रशिक्षण शिबिराला सुरुवात….
४०० पेक्षा जास्त शिक्षक होणार डिजिटल बोर्ड प्रशिक्षक____________
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा : स्वायत्त दर्जा मिळालेल्या शाळा कॉलेजांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक नवे अभिनव प्रयोग राबवायला सुरुवात केलीय. याच धर्तीवर परंडा-भुम- वाशी मतदार संघातील शासकीय व खाजगी अशा १३० शाळांना पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये स्वखर्चातून हे डिजिटल बोर्ड देवून सदरील शाळेमधील शिकवणं स्मार्ट बनविण्याचा विडा उचलला आहे. याच दृष्टीकोनातून १३० शाळेतील शिक्षकांना पुण्यातील तज्ञाकडून डिजिटल बोर्ड कशा पद्धतीने हाताळावयाचे यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ झाला आहे.
शुक्रवारी येथील महात्मा गांधी विद्यालयात या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जयदेव गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर के घाडगे, उपमुख्याध्यापक बी एम लोकरे, आरोग्य दूत बालाजी नेटके, धनंजय खैरे आदी उपस्थित होते. या विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरामध्ये येथील शिक्षकांना पुणे येथील प्रा सचिन गटकुळ, प्रा अनिल नायकवडी, प्रा शुभम राजमाने या तज्ञांनी डिजिटल बोर्ड कशा पद्धतीने हाताळायचा व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ज्ञानदान करावयाचे याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून भूम, परंडा वाशीच्या शाळांमध्ये देण्यात आलेल्या डिजिटल स्मार्ट बोर्ड च्या प्रशिक्षणाला दि. १७ ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून हे प्रशिक्षण शिबिर १९ ऑगस्ट असे तीन दिवस सुरू राहणार आहे.

चौकट….
पुणे येथील जीएसपीएम विद्यापीठातील १५ नामांकित प्राध्यापक शिबिराच्या माध्यमातून परंडा भूम वाशी तालुक्यातील १३० विद्यालयाच्या ४०० शिक्षकांना डिजिटल बोर्ड हाताळण्यासंबंधीचे प्रशिक्षण देत आहेत. मध्यंतरी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी परंडा भूम वाशी तालुक्यातील १३० शासकीय व खाजगी शाळांसाठी तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये स्वखर्चातून डिजिटल बोर्ड दिले आहेत. मात्र संबंधित शाळेतील शिक्षक प्रशिक्षित नसल्याने त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही डॉ सावंत यांनी उचलली असून, त्या दृष्टिकोनातून या तिन्ही तालुक्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
– धनंजय सावंत, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धाराशिव

https://youtube.com/@starmazanews9898

????????????????वरील लिंक ला क्लिक* *यूट्यूब वरील बातम्या पाहा*
*????चॅनल ला सबस्क्राईब करा*
*???? लाईक करा,शेअर करा, बेल आयकॉन दाबा*
*????व्हॉट्स ॲप च्या माध्यमातून बातम्या पाहण्यासाठी ग्रुप ला जॉईन व्हा* *https://bit.ly/3nibn7G*
*???? आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी star maza news चे ॲप डाऊनलोड करा* *https://bit.ly/3NkKwSQ*
*???? ????️????️????️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक :-रियाज पठाण* *9405749898/*
*9408749898*????????????

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!