स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा, ता.१६ (प्रतिनिधी )भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंञी के चंद्रशेखर राव, महाराष्ट्र राज्याचे समन्वयक नेते शंकर धोंडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मंगळवार ता.१५ आॕगस्ट रोजी बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी नुतन जन कार्यालयाचे उदघाटन धाराशिव समन्वयक रामजीवन बोंदर यांच्या हस्ते करण्यात आले. शहरामध्ये तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचे परंडा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार तथा महाराष्ट्र समन्वयक शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक तथा धाराशिव जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा जिल्हा युवा समन्वयक नवनाथ जाधवर, जिल्हा सहसमनव्यक प्रा.मारुती कारकर, चंद्रकांत भराटे, परंडा तालुका विधानसभा संपर्क प्रमुख गुरुदास कांबळे, ॲड एस बी खोत पाटील, ॲड भाऊसाहेब मुंडे ( भूम),परंडा तालुका समनव्यक अशोक कारकर, युवा समनव्यक अक्षय शिंदे,युवा शहर प्रमुख स्वप्नील खोसे पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी धाराशिव समन्वयक बोंदर म्हणाले की,बीआरएसच्या माध्यमातुन “आप की बार, किसान सरकार चा नारा देत राज्यातील शेतकऱ्यांना,समाजातील उपेक्षित घटकांना,गोरगरीबांच्या सर्वांगिण जगण्याचा स्तर उंचविण्यासाठी बीआरएस पक्ष तळागाळापर्यंत काम करीत आहे.तेलंगणा राज्याच्या विकासात्मक माॕडेल धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकरी सुखी चिंतामुक्त झाला पाहिजे.निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाआभावी शेतकरी हतबल आहे.शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नव्याने बीआरएस पक्षात प्रवेश केलेल्या तरुणांचे पक्षाचा गुलाबी पंचा देऊन रामजीवन बोंदर, गुरुदास कांबळे यांनी स्वागत करुन सत्कार केला.यावेळी बीआरएसचे निलेश मुंडे, अक्षय काशीद, तुकाराम जाधवर, श्रीकांत मोराळे, अविनाश टेकाळे, संतोष खंकाळ, साबीर शेख आधि कार्यकर्ते उपस्थित होते.
भारत राष्ट्र समिती पक्षात
नितीन तांबिले, परमेश्वर लाडे, किरण शिंदे, विशाल शिंदे, सचिन शिंदे,रणजीत तांबिले, किशोर शिंदे, आकाश बडेकर, सोहम जगदाळे, अक्षय सांगडे, सचिन कारकर, नवनाथ चांदतारा शेख, अमीर शेख, सचिन कणचे, दादा सल्ले, लक्ष्मण सल्ले, चंदू सल्ले, गजेंद्र वारे, तुषार पवार, अभिषेक पवार, अतुल पवार, अर्जुन काळे आदिसह अनेक युवकांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
https://youtube.com/@starmazanews9898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.