प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियान निकशय मित्र पोषण आहार कीट चे वाटप.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियान निकशय मित्र पोषण २५आहार कीट चे वाटप श्री डॉ विश्वेष कुलकर्णी वैदयकिय अधिक्षक व डॉ श्री विनय कुलकर्णी याच्या हस्ते वाटप करण्यात आले. अभियांना अंतर्गत मा प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या अहवाना ने अमृत महोत्सवी वर्षात क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी वेगवेगळे अभियान राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणुन क्षयरोग रुग्णांसाठी पोषण आहार शहरातील प्रतिष्टीत नागरिक यांच्या वतिने क्षयरोग रुग्णास पोषण आहार देण्यात आले. तसेच उप जिल्हा रुग्णालय परंडा यांच्या वतीने ६ कीट व तालुका आरोग्य कार्यालय याच्या वतिने२ कीट चे वाटप करण्यात आले . तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत वैदयकिय अधिकारी व समुदाय वैदयकिय अधिकारी यांच्या मार्फत क्षय रुग्णांस १७ पोषण आहार कीट वाटप करण्यात आले. आसु २ कीट , जवळा ५, अनाळा ५ ,शेळगांव ५ , या आरोग्य केन्द्रा अंतर्गत वाटप करण्यात आले . यावेळी वाटप करण्यासाठी डॉ अंकुश पवार, डॉ अबरार पठाण डॉ. अश्विनी शिंदे , व श्री दतात्रय आडसुळ क्षयरोग पर्यवेक्षेक , श्री रामचंद्र झिंगे प्रयोगशाळा तंत्रज्ञ , श्री गव्हाणे आय सी टी सी समुपदेशक श्री मकरंद वांबुरकर व रविन्द्र करपे , तानाजी गुंजाळ दिलीप बर्डे हे उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!