www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद,दि.13 ऑगस्ट 2023 :- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे उद्या दि.14 व 15 ऑगस्ट 2023 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
सोमवार दि.14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 02.00 वा. परंडा ता. परंडा जि.उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.दुपारी 02.30 परंडा येथून वाटेफळ ता.परंडा जि.उस्मानाबाद कडे प्रयाण. दुपारी 03.00 वा.वाटेफळ ता.परंडा जि.उस्मानाबाद येथे आगमन व ग्रामस्थांसोबत विविध विकास कामाबाबत चर्चा, दुपारी 03.30 वा. वाटेफळ येथून पांढरेवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद कडे प्रयाण. दुपारी 04.00 पांढरेवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद येथे आगमन जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भुमीपूजन व 25/15 अंतर्गत मंजूर काम पुर्ण रस्त्याचे लोकार्पण व काम पूर्ण झालेल्या सभागृहाचे लोकार्पण व विविध विकास कामाचे भुमीपूजन, सायं 05.10 वा.पांढरेवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद येथून अंभी ता.भुम जि.उस्मानाबाद कडे प्रयाण. दुपारी 05.30 वा. अंभी ता.भुम जि.उस्मानाबाद येथे आगमन. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रा.म.210 अंभी ते जयवंतनगर विजयनगर (0/00 ते 9/900) रस्त्याचे भुमीपूजन – राम मंदिर सभागृह लोकार्पण, सायं 06.00 वा.अंभी ता.भुम जि.उस्मानाबाद येथून पाथ्रुड कडे प्रयाण.सायं 06.15 वा.पाथ्रुड ता. भुम येथे आगमन- नव्याने श्रेणीवर्धन झालेल्या प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी. पाथ्रुड ते बागलवाडी इराचीवाडी रस्त्याचे भुमीपूजन वैजनाथ मंदिर सभागृह भुमीपूजन सायं 07.00 पाथ्रुड ता.भुम जि.उस्मानाबाद येथून वरुड ता.भुम जि.उस्मानाबाद कडे प्रयाण.सायं 07.30 वा. वरूड ता.भुम जि.उस्मानाबाद आगमन पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम भुमीपूजन. रात्री 08.00 वा.वरूड ता.भुम जि.उस्मानाबाद येथून उळूप ता.भुम जि.उस्मानाबाद कडे प्रयाण.रात्री 08.10 वा. उळूप ता.भुम जि.उस्मानाबाद येथे आगमन. तिर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या कानिफनाथ मंदीराच्या कामाचे भुमीपूजन तसेच विविध विकास कामांचे भुमीपूजन रात्री 08.40 वा.उळूप ता.भूम जि.उस्मानाबाद येथून उस्मानाबादकडे प्रयाण. रात्री 09.30 वा.शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.
मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 08.55 वा. शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथून जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद कडे प्रयाण. सकाळी 09.04 वा.जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे ध्वजस्तंभाकडे आगमन सकाळी 09.05 वा. स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण,राष्ट्रगीत व राज्यगीत सकाळी 09.09 वा. हुतात्मा स्मारकाच्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण सकाळी 09.14 वा.स्वातंत्र्य दिनाचा 76 वर्धापन दिनानिमित्त उपस्थित जनतेस संबोधन सकाळी 09.22 वा.स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्काराचे वितरण सकाळी 09.32 वा. स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक,शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील यांना भेट व शुभेच्छा- सकाळी 09.45 वा.पालकमंत्री कार्यालय,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वा. पालकमंत्री कार्यालय,उस्मानाबाद येथे प्रधानमंत्री टी.बी. मुक्त अभियानातंर्गत TB रुग्णांना पोषण आहार कीटचे वाटप. सकाळी 11.30 वा.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,उस्मानाबाद करिता जागेची स्थळ पाहणी.दुपारी 01.00 वा.उस्मानाबाद जि.उस्मानाबाद येथून कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद कडे प्रयाण. दुपारी 02.00 वा.कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद येथे आगमन.शिवछत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ता.कळंब जि.उस्मानाबाद चे उदघाटन दुपारी 03.00 वा.नगर परिषद, कळंब मधील प्रलंबित विकास कामाबाबत आढावा बैठक दुपारी 04.00 वा.कळंब जि.उस्मानाबाद येथून हासेगाव (के) ता.कळंब जि.उस्मानाबाद कडे प्रयाण.दुपारी 04.05 वा.हासेगाव (के) ता.कळंब जि.उस्मानाबाद येथे आगमन 95/5 अंतर्गत मंजूर रस्त्याचे भुमीपूजन दुपारी 04.15 वा.हासेगाव (के) ता.कळंब जि.उस्मानाबाद येथून तेरखेडा ता.वाशी जि.उस्मानाबाद कडे प्रयाण. दुपारी 04.40 वा. तेरखेडा ता.वाशी जि.उस्मानाबाद येथे आगमन 25/15 अंतर्गत मंजूर मुस्लीम कब्रस्थान भुमीपूजन. आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन.पशुवैद्यकीय दवाखाना लोकार्पण दुपारी 05.00 वा.तेरखेडा ता.वाशी जि.उस्मानाबाद येथून येरमाळा,बार्शी मार्गे पुणे कडे प्रयाण.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.