आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्ट 2023 महा – युवासंवाद

Picture of starmazanews

starmazanews


एच आय व्ही / एड्स जनजागरण अभियान

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मार्फत प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने आज रा.गे शिंदे महाविदयालय येथे मा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राज गलांडे पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री उद्धव कदम साहेब , श्री महादेव शिनगारे यांच्या सुचनेनुसार व डॉ श्री विश्वेश कुलकर्णी वैद्यकिय अधिक्षक व श्री सुनिल जाधव प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी एच आय व्ही एड्स आणि लैंगिक आजार तसेच व्यसणासंबंधी मार्गदर्शन डॉ. आनंद मोरे यांनी केले. यात विद्यार्था देशाचा कणा आहे याला व्यसणासारखे राक्षसणाने गाठु नये म्हणुन तरुणांनी व्यसणापासुन दुर राहावे. तरुणांनी चांगल्या संस्काराचा अमुल्य दागीना अंगीकारावा व आई वडीलां प्रति कायम ऋणी असावे. असे प्रतिपादन डॉ. प्रा. श्री शहाजी चंदनशिवे यांनी केले. यावेळी विदयार्था व विद्यार्थिनीना तंबाखु मुक्त ची शपथ श्री तानाजी गुंजाळ यांनी दिलीयावेळी जागतिक युवा दिनानिमीत विविध स्पर्धा चे आयोजन करण्यत आले आहे या मध्ये विद्यार्थानी भाग घ्यावा.प्रतिपादन आय सी टि सी चे मकरंद वांबुरकर व रविन्द्र करपे यांनी केले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!