जिल्हा परिषदच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदांसाठी अर्ज करावेत –सुर्यकांत भुजबळ

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

उस्मानाबाद,दिनांक : 11 ऑगस्ट 2023 महाराष्ट्र शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरळसेवेच्या कोटयातील 75 हजार पदांची मेगाभरती अंतर्गत जिल्हा परिषदांकडील सरळसेवा भरतीसंदर्भात अर्ज स्विकृतीची प्रक्रिया दि.5 ऑगस्ट 2023 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

यामध्ये जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत गट-क मधील विविध विभागाकडील एकूण 21 संवर्गातील (वाहन चालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) 453 पदे सरळसेवेने भरण्यासाठीची जाहीरात दि.5 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.सदरील पदभरती ही ऑनलाईन पध्दतीने आय.बी.पी.एस. (इंस्टीटयुट ऑफ बँकिग पर्सोनेल सिलेक्शन), कांदिवली (पुर्व) मुंबई-4000101 या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.त्यानुषंगाने विविध पदासाठी दि.5 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत सरळसेवा पदभरतीचे अनुषंगाने उमेदवारांना जाहीरातीसंदर्भात काही समस्या काही समस्या/शंका उद्भवल्यास अशा समस्या/शंका निवारणासाठी सामान्य प्रशासन विभाग जि.प.उस्मानाबाद अंतर्गत मदत कक्ष (Help Desk) तयार करण्यात आलेला आहे.जाहिरातीच्या अनुषंगाने काही शंका असल्यास उमेदवारांनी 02472-223388 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.15 या वेळेत संपर्क साधावा.

त्याचप्रमाणे उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://www.cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा 1800 222 366/1800 103 4566 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) सुर्यकांत भुजबळ यांनी केले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!