पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:-शहरातील विविध भागात डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांच्या रुग्णात वाढ झाली आहे. त्या आजारांच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या मागणीसाठी आज पुणे महापालिकेसमोर मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी साईनाथ बाबर म्हणाले की, पुणे शहरातील भागात डेंगू, मलेरिया, चिकन गुनिय सारख्या साथीच्या आजाराच्या रुग्णात वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. या विभागामार्फत कोणतेही प्रकारच्या उपायोजना केल्या जात नाही .त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात रुग्णांना रक्त तपासणी करतेवेळी खाजगी लॅबचालक मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असून नागरिकांचे एका प्रकारे लूट होत आहे. या सर्व बाबीवर महापालिका प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आज आम्ही पालिकेचे समोर आंदोलन करीत आहोत. आंदोलनाची दखल महापालिका विक्रम कुमार यांनी घ्यावी अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.