विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी – तहसीलदार अडसूळ.

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने/शहाजी चंदनशिवे
परांडा दि . 6 ऑगस्ट 2023 विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे स्वतःचे आणि आपल्या आई वडिलांचे नाव समाजामध्ये उज्वल करावे असे प्रतिपादन परंडा येथील तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे आयोजित केलेल्या महसूल सप्ताह निमित्त युवा संवाद कार्यक्रमात व्यक्त केले .
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 /प्र क्रं . 149 /ई -1 / दि. 25 जुलै 2023 मा जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक 2023 महसूल /जमा -2 / कावि दि. 25 जुलै 2023 या दि . आगस्ट २०२३ च्या संदर्भीय पत्रानुसार महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांमध्ये अधिकाधिक माहिती पोहोचावी याकरिता महसूल सप्ताह व युवा संवाद कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार घनश्याम अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे मंडल अधिकारी पवार यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले . यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार घनश्याम अडसूळ म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून गुणवत्तापूर्वक शिक्षण घ्यावे . स्पर्धा परीक्षा साठी तयारी करावी . मोठमोठे अधिकारी व्हावेत .
याचबरोबर त्यांनी सांगितले की 18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नियुक्त केलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडून फॉर्म भरून घ्यावेत . महाविद्यालयांमध्ये मतदार यादी मध्ये नोंदणी करण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत .तहसीलदार घनश्याम अडसुळे यांनी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांसोबत करिअरच्या संदर्भात संवाद साधला . निवडणूक प्रक्रिया काय असते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले . नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव यांनीही लोकसभा विधानसभा निवडणूक संदर्भात मतदार म्हणून मतदारांची जबाबदारी काय असते यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले .शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा किरण देशमुख यांनी मानले .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!