www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद,दि.दि.07 ऑगस्ट 2023:- बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की अर्धवट लसीकरण झालेले, लसीकरण न झालेले बालके ही पूर्ण लसीकरण झालेले बालका पेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यूमुखी पावतात. या अनुषंगाने जिल्हयात आज सर्व ठिकाणी विशेष मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येत असून ही मोहिम एकूण तीन टप्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात 7 ते 12 ऑगस्ट दुसरा टप्पा 11 ते 16 सप्टेंबर तिसरा टप्पा 9 ते 14 ऑक्टोंबर या तिनही टप्या दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील 0 ते ५ वर्ष वयोगटातील अर्धवट किंवा गळती झालेल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर सदर मोहिम बाबत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना- 1 वैराग रोड येथे विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 लसीकरण मोहिमेचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे पाटील यांनी फित कापून उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांना बालकांच्या लसीकरणा बाबत मार्गदर्शन केले व लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले या विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 या मोहिमे अंतर्गत झीरो ते पाच वर्ष वयोगटातील अर्धवट किंवा गळती झालेल्या बालकांचे लसीकरण पुर्ण करुन घेण्यात येणार आहे. तसेच बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला दुसरा राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचे ही लसीकरण करण्यात येणार आहे. त्याच बरोबर गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसी द्वारे लसीकरण करण्यात येणार असून, 6 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा समावेश करण्यात आला आहे.
या उद्घाटन सोहळ्यास जिल्हास्तरीय अधिकारी सांखिकी पर्यवेक्षक हेमंत पवार, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारीका शेजवळ आरोग्य सहाय्यक राजेश सुपेकर आशा कार्यकर्ती तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना-1 वैराग रोड येथिल वैद्यकिय अधिकारी डॉ. शकील खान व कर्मचारी उपस्थित
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.