पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पुणे परिसरात व मावळ भागात चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याने मुळशी व पवना धरणे बऱ्यापैकी भरली आहेत.त्यामुळे मुळा व पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन होणार असून नदीकाठच्या गावांना व रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः दोन्ही नद्यांच्या संगमावरील दापोडी व जुनी सांगवी वर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे मुळशी धरणातून बुधवारी दि. २ दुपारी १ पासून १००० क्युसेस प्रमाणे विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाटोपाठ पवना धरणातून गुरुवारी दि. ३ सकाळी ११ पासून १४०० प्रमाणे विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग केलेल्या पाणी शुक्रवार दि ४ पहाटेपर्यंत शहरात पोहोचू शकते मात्र, त्यापूर्वीच धरणाच्या खालील बाजूस सुरू असलेल्या सततच्या पावसाने ओढे, नाले व कासारसाई नदी दुथडी भरून वात आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुळा पावना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा या दोन्ही नद्यांचा संगम होतो. त्यामुळे संगमाच्या परिसरात पाण्याचा अधिक फुगवटा होऊन नागरी भागात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होते मुळा नदीच्या काठावर वाकड पिंपळे निलक, आणि जुनी सांगवी आहे. तर पवना नदीच्या काठावर कीवळे, रावेत, पुनावळे ,थेरगाव, वालेकरवाडी, चिंचवड, पिंपरी ,काळेवाडी ,राटनी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, फुगेवाडी, नवी सांगवी दापोडी, जुनी सांगवी चा काही भाग आहे. तसेच पावना धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठची शेती, अवजारे व जनावरे तात्काळ हलविण्यात यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.