माहिती अधिकार कार्यकर्ते विरुद्ध ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट आणि विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावे यासाठी निवेदन,

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज प्रतिनिधी सोमनाथ गायकवाड. बार्शी :- 05/08/2023 दिनानाथ माणिक काटकर व राज संजय नानावाटी यांच्या विरुध्द ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट आणि विविध कलमान्वये तात्काळ गुन्हे दाखल करावे ,
अन्यथा आंदोलन करीत असल्याचे लहुजी शक्ती सेना व्दारे देशव्यापी संघटने मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे.

दि ०२ ऑगस्ट २०२३ रोजी बार्शी शहर येथे जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूक आणि विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आली यावेळी मिरवणुकी दरम्यान दिनानाथ माणिक काटकर व राज संजय नानावाटी या व्यक्तींनी मिरवणुकी जवळ येऊन महिलांचे विना परवानगी व्हीडीओ चित्रीकरण करुन, अश्लिल इशारेबाजी केल्याचे महिलांकडून सांगण्यात आले ..
आणि जयंती महोत्सवास अडवणुक करुन सामाजिक सलोखा भंग करुन दंगल घडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले..

तरी दिनानाथ माणिक काटकर व राज संजय नानावाटी या व्यक्तींवर विविध कलमे आणि ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावा,
अन्यथा लहुजी शक्ती सेना व्दारे देशव्यापी संघटने मार्फत राज्यभर तिव्र स्वरुपाची अंदोलने करण्यात येतील आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रशनास प्रशासन स्वतः जबाबदार राहील असा ईशारा लहुजी शक्ती सेना व्दारे देण्यात आला आहे… सदर प्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी बार्शी यांना व बार्शी पोलिस स्टेशन PI यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी लहुजी शक्ती सेना
राज्य कार्यकारिणी सदस्य
मा.रोहित भाऊ खलसे,ता.अध्यक्ष मा.लखन शेंडगे, शहराध्यक्ष मा.प्रशांत भाऊ काळे, युवक शहराध्यक्ष दास पवार, विद्यार्थी सेना अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, भास्कर बगाडे, बाबा शेंडगे, अक्षय सांळुखे ,विकी खलसे, रोहन खलसे, इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!