पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.१ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा झाला होता. त्या पाठोपाठच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवार दि.६ रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत आहेत. केंद्र शासनाच्या एका कार्यक्रमात चिंचवड येथे सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने जोरदार तयारी केली आहे. केंद्रीय पंजीयक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम रविवारी दुपारी १२ वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. त्याचबरोबर अमित शहा शुगर फेडरेशनच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी अमित शहा शनिवारी रात्री पुणे शहरात येणार आहेत. रविवारी चिंचवड येथील कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील केंद्रीय गृह मंत्री येणार असल्याने शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्ताचे तयारी सुरू केली आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.