अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृत्यशीलतेवर आधारलेले होते – डॉ हरिश्चंद्र गायकवाड.

Picture of starmazanews

starmazanews


माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची झाली काहीली या सादर केलल्या कवितेला भरपूर प्रतिसाद मिळाला .
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे
प्रतिनिधी
परांडा दि . २ ऑगस्ट 2023 अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते . संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती . संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉम्रेड अमर शेख आणि लाल बावटा कलापथकाद्वारे त्यांनी प्रबोधनाचे काम केले . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे योगदान दिले आहे . पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथा शैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायापर्यंत पोहोचण्यास मदत झाली .असे मत
येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले . ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे परिवेक्षक प्रा किरण देशमुख प्रा विजय जाधव प्रा संभाजी धनवे यांची उपस्थिती होती . यावेळी सृष्टी गुंडगिरे आणि कोमल ठोसर या विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली तर प्रा विजय जाधव यांनीही विस्तृत स्वरूपामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जीवन पाठ समोर मांडला .
पुढे बोलताना डॉ हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले की जातिव्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघ्या दीड दिवसात शिक्षण मिळाले तर आपल्या लेखणीतून कष्टकरी उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे केवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एकमेव नेते होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संभाजी धनवे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा किरण देशमुख यांनी मानले .यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!