www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.
दिनांक 20 मार्च 2023 रोजी च्या विधान भवन मुंबई येथे घेतलेला बैठकीमध्ये राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतले होते त्याचप्रमाणे याआधी वेळ झाल्या बैठकीमध्ये सकारात्मकच निर्णय झालेले होते त्या निर्णयाच्या अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 31 जुलै 2023 रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित राज्याव्यापी मोर्चाचे आयोजन होते पण पावसाळी अधिवेशन वेळापत्रका नुसार आजचे विधान भवन वरील आंदोलन रद्द करण्यातरद्द करण्यात आलेले आहे त्या त्या अनुषंगाने माननीय समन्वय समितीच्या वतीने बार्शी नगरपरिषद कामगार संघाचे अध्यक्ष अँड नागेश हरिभाऊ अक्कलकोटे व नगरपरिषद कामगार संघाचे सर्व सदस्य यांच्यावतीने माननीय मुख्य अधिकारी बार्शी नगरपरिषद बार्शी यांना निवेदन देण्यात आले तसेच बार्शी नगरपरिषद कार्यालयांमधील 3272 व 1403 मधील काही कर्मचाऱ्यांना हंगामी ऑर्डर देऊन दोन वर्ष झालेले आहेत त्या सर्व कर्मचारी यांना कायम नियुक्ती देण्याचे व काही विभागांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव दिसून येत असल्याने बार्शी नगर परिषदेतीलआकृतीबंधानुसार इतर अधिकाऱ्यांच्या जागी पात्र कर्मचारी नियुक्त्या पदोन्नती बाबत बार्शी नगरपरिषद कामगार संघाचे अध्यक्ष अँड नागेश हरिभाऊ अक्कलकोट यांनी मागणी केली.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.