पुण्यात युवक काँग्रेसकडून बॅनरबाजी,Go Back Mr Crime Minister

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.


पुणे :- ३१ जुलै २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला युवक काँग्रेसकडून विरोध, पुण्यात बॅनरबाजी नरेंद्र मोदी हे उद्या दि.१ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्याला पुणे शहर युवक काँग्रेसकडून विरोध दर्शविला जात असुन त्यांच्याकडून ‘ गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर ‘ अशा आशयाचे बॅनर शहरातील अनेक भागांत लागले आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ.रोहित टिळक यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराच्या कमिटीमध्ये रोहित टिळक होते. आणि ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जाऊ नये अशी मागणी शहरातील काँग्रेस पक्षातील प्रमुख पद अधिकारी यांनी रोहित टिळक यांच्याकडे केली होती. तर या पुरस्काराबाबत हाय कमांड कडे तक्रार करीत नाराजी देखील काँग्रेस पद अधिकारीने व्यक्त केली होती. या सर्व घडामोडीनंतर उद्या १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक संघटना एकत्रित आले आहेत. उद्या ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाण्याच्या मार्गावर मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार आहे. पण त्यापूर्वीच शहर काँग्रेसकडून ‘गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर’ अशा आशयाचे फ्लेक्स शहरातील अनेक भागात लागले आहे. या फ्लेक्स ची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!