डॉ.आनंद मोरे परंडा तक्रारीची ‘राज्य पोलिस प्राधिकरण ‘कडून दखल .

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
काय आहे प्राधिकरणः-

पोलीसांच्या गैरकृत्यावर अंकुश ठेवणारे आणि पिडीतांना न्याय मिळवून देणारे हे प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारी न्यायसंस्था आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्रीहरी डावरे हे अध्यक्ष व समाजातील मान्यवर व्यक्ती म्हणून श्री. उमाकांत मिटकर हे त्याचे न्यायीक सदस्य आहेत. पोलीसांकडून होणारा छळ, अत्याचार आदी प्रकरणावर प्राधिकरण काम करते. मुंबई उच्च न्यायालयाच्या जवळ नरिमन पॉइंट येथे त्याचे न्यायालय आहे.

डॉ. श्री. आनंद मोरे हे एक नामांकीत लेखक आहेत. ते स्वतः एक नामांकीत डॉक्टर असुन एम. डी. आयुर्वेद आहेत. डॉ. आनंद मोरे हे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर म्हणून उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे सरकारी दवाखाण्यात आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणुन १४ वर्षापासुन नोकरीत कार्यरत आहेत.

दिनांक २८/०१/२०२३ रोजी डॉ. मोरे हे सरकारी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे नेहमी प्रमाणे शासकीय कर्तव्य बजावत असताना सकाळी ११:४५ वाजेचे सुमारास अर्जदार हे बाहय रुग्ण तपासणी विभागात सरकारी उपजिल्हा रुग्णालयात येणारे रुग्णांची, पेशंटची तपासणी करीत असताना आरोपी नामे राकेश सुर्यवंशी व डॉ. स्मिता पाटील हे तेथे आले आणि “श्री गुरुदास कांबळे यांनी आमचे विरुद जी तक्रार दिली आहे ती तुमचेचे सांगणेवरुन दिली आहे.” असे म्हणुन याचा राग मनात धरून आरोपींनी डॉ. आनंद मोरे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि आर. पीयुसी पाईपने मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अर्जदाराचे डोक्याला, नाकाला गंभीर जखम झाली व नाकातून रक्त येवु लागले, त्यामुळे आरोपी राकेश सुर्यवंशी व स्मिता पाटील यांचे विरुध्द परंडा पोलीस स्टेशनला एफआयआर नं. २९/२०२३ नुसार भा.दं.वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, २९४ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

एकंदरीत वरीलप्रमाणे परिस्थीती असताना सहा. पोलीस निरीक्षक गैरअर्जदार नं. १ सौ. कविता मुसळे यांनी जाणीवपुर्वक अर्जदार यांची फिर्याद त्यांचे म्हणणेप्रमाणे नोंदविली नाही. अर्जदार हे शासकीय कर्तव्य बजावत होते, अर्जदारास झालेल्या जखमा गंभीर स्वरुपाच्या आहेत, नाकाचे हाड मोडले आहे हे सर्व माहित असताना देखील सौ. मुसळे यांनी सदर गुन्हयामध्ये भारतीय दंड विधान से कलम ३५३, ३२६, ३०७ ही कलमे एफआयआर मध्ये जाणीवपुर्वक लावली नाहीत, अर्जदाराची. एफआयआर वर सही ने घेताच तो कोर्टात पाठवून आरोपींना मदत केली, ही बाब अतिशय खेदजनक आहे. यामुळे डॉ. मोरे यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे डॉ. मोरे यांची एफआयआर वर सही न घेता आरोपीला वाचविण्यासाठी अर्जदाराची केस कमजोर करण्यास तसेच इतर आवश्यक कलमे न लावून गैरअर्जदार पोलीसांनी आरोपीस मदत करून बेकायदेशीर वर्तन केलेले असल्यामुळे गैरअर्जदार संबंधीत पोलीसांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे प्रकरणाचे परिस्थीतीत व न्यायाचे दृष्टीने योग्य होईल.

परंडा पोलीस स्टेशनचे वरील गैरवर्तनाचे प्रकाराबाबत डॉ. मोरे यांनी पोलीस अधिक्षक उस्मानाबाद तसेच पोलीस उपअधिक्षक भुम, जि. उस्मानाबाद यांचेकडे वारंवार तोंडी व लेखी ईमेल व्दारे तकार केली परंतु त्यांनीही दुर्लक्ष करुन अर्जदाराचे तकारीची दखल न घेतल्याने डॉ. मोरे यांनी मा. अध्यक्ष राज्य पोलीस तकार प्राधिकरण महाराष्ट्र, मुंबई यांचे प्रधीकरणाकडे सहायक पोलीस निरीक्षक सौ. कविता मुसळे, पोलीस निरीक्षक श्री. अमोद भुजबळ व तत्कालीन पोलीस उप अधिक्षक श्री. दिनकर डंबाळे यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सन्माननीय न्यायमुर्तीनीं डॉ. मोरे यांचे केसमध्ये प्रथमदर्शनी तथ्य दिसुन येत असल्यामुळे सदरची तकार दिनांक १४/०७/२०२३ रोजी अॅडमीट करुन घेत असलेचा आदेश केला आहे आणि डॉ. मोरे यांचे तक्रारीचे अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक सौ. कविता मुसळे, पोलीस निरीक्षक श्री. अमोद भुजबळ व तत्कालीन पोलीस उप अधिक्षक श्री. दिनकर डंबाळे यांचे विरुध्द नोटीस जारी करण्याचा आणि संबंधीतांनी दिनांक २२/०८/२०२३ रोजी हजर राहून याप्रकरणी त्यांचे म्हणणे दाखल करण्याचा आदेश केला आहे. सदर प्रकरणी डॉ. आनंद मोरे यांचेवतीने त्यांचे विधिज्ञ अॅड. संतोष सुर्यवंशी, परंडा यांनी युक्तीवाद केला.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!