स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या तीन मार्गांचे उद्धाटन पुढील आठवड्यात पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्यातील ११.६६ कि मी मार्गाचे लोकार्पण होणार आहे.त्यामुळे पुणे – आणि पिंपरी चिंचवड ही दोन शहरे देखील जोडली जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट ६.९१ कि.मी.,गरवारे महाविद्यालय ते सिव्हिल कोर्ट २.३८ कि.मी., सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल २.३७ कि.मी या तीन मार्गांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असणार आहे.या सर्व मार्गासाठी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन हे इंटरचेंज असणार आहे.यामुळे वनाज ते पिंपरी चिंचवड आणि रुबी हॉल ते पिंपरी चिंचवड तसेच वनाज या मार्गावर मेट्रोने प्रवास करता येणार आहे मार्च २०२३रोजी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १२.२ किलोमीटर मार्गाचे लोकार्पण झाले. गरवारे मेट्रो स्थानकात उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मोदी यांनी मेट्रो मधून प्रवास करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मेट्रो सुरू झालेले पुणे आणि पिंपरी चिंचवड करांनी सुरुवातीला पर्यटन म्हणून महत्त्वाच्या प्रवास केला. मात्र पिंपरी मधून पुणे शहरात जाण्यासाठी मेट्रो उपयोगाचे नसल्याने मेट्रो कडे दळणवळणाचे साधन म्हणून पाहिले गेले नाही. आता दुसऱ्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर एकमेकांना जोडली जाणार असल्याने दोन्ही शहरातील नागरिकांना दळणवळणाचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.