पालकांनो सावधान, अल्पवयीन मुलांना वाहने चालवू द्याल तर होईल २५ हजारांचा दंड.

starmazanews_v

starmazanews_v


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- २७ जुलै अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यासाठी दिली तर त्यांच्या पालकांवर आर्थिक दंड आकारण्याचे तरतूद आहे. पालकांना तब्बल २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने गुरुवारी दिनांक २७ एकाच वेळी सर्व वाहतूक विभागांमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात विशेष मोहीम राबवली. यामध्ये अनेक अल्पवयीन मुले वाहने चालवताना आढळून आले आहेत. त्यामुळे अल्पवयीन वाहन चालकांच्या बाबतीत त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या पिंपरी चिंचवड , सांगवी, वाकड हिंजवडी, देहू रोड ,तळेगाव तळवडे, भोसरी देखील आळंदी, चाकण, बावधन भांगे १४ विभागांमध्ये एकाच वेळी शाळा महाविद्यालयाच्या परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. ट्रिपल सीट वाहने चालविणे, अल्पवयीन वाहन चालक, वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे, अस्तव्यसत पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, असे अनेक प्रकार वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहेत.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!