स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा शहरातील खासापूरी रोड कल्याणसागर माध्यमिक विद्यालय सरस्वती प्राथमिक विद्यालय लहान दूध डेरी व्यापारी संकुलणे तसेच कब्रस्तान आदि या या रस्त्यालगत असल्याने याच रस्त्याने पंढरपूर आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्रातील तिसरा मान असलेला संत एकनाथ महाराजांची पालखी लाखो वारकऱ्यासह याच मार्गे जात असून तेथे रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व तेथील नागरिकाने प्रचंड हाल होत आहेत. त्या कडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.नगरपरिषद प्रशानन मुग गिळुन गप का आहे असा प्रश्न शहर वाशीयांना पडला आहे. या पुर्वीच परंडा शहराला कोटयावधीचा निधी कागदोपत्रीच राहिला का असा विचार करणारा प्रश्न नागरीकांना पडला आहे . याच रस्त्यावर सकाळी लहान मुले शाळेत जातात शाळेत जात आसताना ते मुले पाण्यात पडतात त्यांच्या जिवीतास . धोका निर्माण होत आहे याला जबाबदार कोण. प्रशासनाने तत्काळ त्याची दाखल घ्यावी जेणेकरून शाळेच्या मुलांना व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.