पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
आळंदी:- ऍडिनो व्हायरस मुळे डोळ्यांची साथ आली असल्याचा दावा आरोग्य संचालकांचा आहे. आळंदीत साथीचे अनेक रुग्ण ऍडीनो व्हायरसमुळे डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग होण्याच्या (डोळे येणे) प्रकारात वाढ झाली असून, त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबेडकर यांनी केले आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील आळंदी भागात तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात डोळे आलेले अनेक रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सम्य प्रकारचा संसर्ग असला तरी देखील याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. असे आदेश आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबेडकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांना काढले आहेत. राज्यातील अनेक भागात उन्हाळा किंवा पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ सुरू होते. डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ऍडिनो व्हायरसमुळे होतो. असे म्हटले आहे. ज्या भागात डोळे येण्याची साथ सुरू आहे किंवा, मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागात आरोग्य सेविकांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करा या भागात पावसामुळे किचकीच घरगुती माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर परिसर स्वच्छता आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात डोळे आलेल्या रुग्णांमध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यातला सूज येणे अशी लक्षणे आढळतात या व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करायला हवा तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.