श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:- १ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या दौऱ्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. तसेच टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमासह अन्य काही कार्यक्रमही होणार आहेत. त्यात महापालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी २०१८ मध्ये पाच वेगवेगळ्या भागात पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. त्यानुसार पूर्ण झालेल्या घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातसे १ ऑगस्ट रोजी लोक अर्पण होणारा असून शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॅप्टरने सिंचन भवन येथे येणार आहेत. पंतप्रधानाच्या पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांची बैठक झाली. तसेच त्यांनी मोदी यांच्या लोहगाव ते कार्यक्रम स्थळ या मार्गाचे पाहणी केली आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!