www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद,दि,24 जुलै 2023 :- बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेले, लसीकरण न झालेले बालके ही पुर्ण लसीकरण झालेले बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयात माहे ऑगस्ट 2023 पासून तीन फेऱ्यामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, नर्सिंग स्टाफ यांच्यामार्फत घरोघरी जावून सर्वे करण्यात आला आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीष हरिदास यांनी मोहिमेबाबत सभागृहास माहिती दिली तसेच जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी या मोहिमेमध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेले व अर्धवट लसीकरण झालेले गरोदर माता व ते 5 वर्ष वयापर्यंतच्या बालकांचा शोध घेवून त्यांना लसीकरण करावयाचे असल्याचे सभागृहात सांगितले. ते म्हणाले सर्व आरोग्य संस्थांना याविषयी माहिती देण्यात आली आहे आणि आरोग्य संस्थाकडून माहिती घेण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.
लसीकरण सत्राचे नियोजन शहरी आणि ग्रामीण दोन्हीं भागात केले जाईल. सर्व सत्रे व यु-विन ॲपवर तयार करण्यात येणार आहेत. ही मोहिम तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
पहिला महिना 7 ते 12 ऑगष्ट 2023, दुसरा महिना व तिसरा महिना 11 ते 16 सप्टेंबर 2023,
9 ते 14 ऑक्टोबर 2023 यामध्ये मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थी यांनी या मोहिम कालावधीमध्ये अर्धवट राहिलेले लसीकरण पुर्ण करुन घ्यावे असे आवाहन केले.
शेवटी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सभागृहास मार्गदर्शन करताना सुचित केले की, मिशन इंद्रधनुष 5.0 यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते सहकार्य करावे, लसीकरणाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येवून मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी असे निर्देश दिले.
या बैठकिस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा सं) डॉ. शिवाजी फुलारी, माहिती अधिकारी यासिरोद्दीन काझी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बा.क.) डी. एम. गिरी, अधिष्ठाता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय डॉ.देशपांडे (प्रतिनिधी), अधिष्ठाता, आयुर्वेदीक वैद्यकिय महाविद्यालय डॉ. विलास बोरसे (प्रतिनिधी), जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. एम. भुजबळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर.बी. सोनटक्के (प्रतिनिधी), शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) एस. बी. वीर (प्रतिनिधी), अधिक्षक अभियंता, म.रा. वि.वि.कं. समीर देवकर (प्रतिनिधी ), व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ सतिश पाटील (प्रतिनिधी), जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड, जिल्हा मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी किशोर तांदळे, सांख्यिकी पर्यवेक्षक हेमंत पवार, सार्वजनिक आरोग्य परिचारिका दराडे व शेजवळ, सांख्यिकी अन्वेषक कलीम शेख यांचेसह आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.