स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:-अमरावतीतील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचे हत्या केल्याचे धकादायक घटना बालेवाडी भागात घडला. पत्नी आणि पुतण्याचा हत्या करून सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी स्वतःवरील गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेत सहाय्यक आयुक्त गायकवाड यांची पत्नी मोना गायकवाड वय वर्ष ४४ आणि पुतण्या दीपक गायकवाड वय वर्षे ३४ यांचा मृत्यू झाला आहे. सहाय्यक आयुक्त गायकवाड अमरावतीतील राजपेठ विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने ते पुण्यात आले होते. पुण्यात बालेवाडी भागात गायकवाड त्यांची पत्नी दोन मुले आणि पुतण्या राहायला होते. रविवारी मध्यरात्री गायकवाड यांनी पत्नी मोना आणि पुतण्या दीपक यांच्यावर पिस्तूलातुन गोळीबार केला .त्यानंतर स्वतःही वरही पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गायकवाड यांच्याकडे असलेली पिस्तूल जप्त केले आहे. गायकवाड यांनी खाजगी वापरासाठी पिस्तूल घेतली होती त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याचा खून का केला, याबाबत ची माहिती मिळू शकली नाही. चतुर्शिंगी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.