बार्शी मेडिकल क्षेत्रात मोठी खळबळ ! गर्भावती महिलेचा गर्भापात करताना बार्शी पोलिसांचा छापा!

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898बार्शी,प्रतिनिधी दिनांक 23जुलै 2023.
गेल्या काही दिवसापूर्वीच घडलेले तोतया डॉक्टर स्वामी याचे प्रकरण ताजे असतानाच बार्शीच्या मेडिकल क्षेत्रामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार बार्शीमध्ये उघडकीस आला आहे. एकीकडे मेडिकल हब म्हणून बार्शीची ओळख निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मेडिकल क्षेत्राला काळिमा फसणारे अमानुष कृत्य काही समाजकंटकाकडून केले जात आहे.

काल दि 22/07/2023 रोजी पोलीसांना गोपणीय बातमीदारा मार्फत माहीती नुसार कासारवाडी रोड बार्शी परीसरामधील एका घरामध्ये अवैद्यपणे गर्भपात केला जात आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने संतोष गिरिगोसावी पोलीस निरीक्षक, बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पो. नि. संतोष गिरिगोसावी, पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड, पोहेकॉ. देशमुख, पोना. खराडे, पोकॉ. बागल व दोन पंचासह कारवाई करीता खाजगी वाहनाने गेले असता, 11.00 वा चे सुमारास एक महिला संशयीत रित्या हातामध्ये पिशवी घेवुन भोईटे कन्स्ट्रक्शन अपार्टमेंट कासारवाडी रोड बार्शी येथील सोनल आनंत चौरे यांचे मालकीचे घरात गेली. मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस स्टाफ व पंच असे सदर महिलेच्या पाठिमागे गेले असता,भोईटे कन्स्ट्रक्शन अपार्टमेंट कासारवाडी रोड बार्शी येथील सोनल आनंत चौरे यांचे मालकीचे घरात आतल्या बेडरुमचे खोलीमध्ये एकुण चार महिला मिळुन आल्या. त्यापैकी एक महिला बेडवर झोपलेली होती व तीच्या शेजारी तीन महिला उभा असल्याचे दिसून आले.

बेडवर झोपलेल्या महिलेला नाव व पत्ता विचारले असता तीने तीचे नाव अ. ब. क. 1 बार्शी असे सांगुन तीच्या सोबत तीची आई अ. ब. क. 2 बार्शी हि आली असल्याचे सांगुन आम्ही येथे माझा गर्भपात करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उभा असलेल्या इतर दोन महिलांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु पोलीसांनी अधिक विश्वासात घेवुन त्याची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) सुषमा किशोर गायकवाड, वय 40 वर्षे धंदा- नर्सींग रा. ताडसौदने रो, बार्शी 2) उमा बाबुराव सरवदे, वय 50 वर्ष, धंदा- आया/मावशी , रा. हिरेमठ हॉस्पीटल, बार्शी असे असल्याचे सांगितले.

त्यावेळी त्यांच्या जवळ असलेले खालीलप्रमाणे वर्णनाचे इंजक्शन व औषध गोळ्या मिळुन आल्या.
1) 87/-रु एक Tranexamic Acid Injection IP 500 mg त्यावर Pause असे लिहिलेले कि.अं
2) 3440/-रु किमतीचे तीन CLEAR-KIT नावाचे आठ पँकेट प्रत्येकी 5 गोळ्याने भरलेले पँकेट कि.अं
3) 850/-रु किमतीचे दोन safe-t kit नावाचे दोन पँकेट त्यामध्ये प्रत्येकी 4 गोळ्याने भरलेले व 1गोळी रिकामी असलेले पँकेट कि.अं
4)1275/-रु किमतीचे तीन safe-t kit नावाचे तीन रिकामे पँकेट कि.अं
5)194.67/-रु किमतीचे Pause-500 नावाचे एक पँकेट त्यांमध्ये एकुण 10गोळ्या भरलेले पँकेट कि.अं
6) 55/- रु किमतीचे CYCLOPAM नावाचे एक पँकेट त्यांमध्ये एकुण 10गोळ्या भरलेले पँकेट कि.अं
7) 8.50/-रु किमतीचे ROMO JET 5ml नावाचे एक सिरिंज विंथ नीडल कि.अं
8)100/- रु किमतीचे 20 नग ग्लोज कि.अं
9)96/-रु किमतीचे Whisper Choice Ultra कंपणीचे 2नग सँनीटरी पँडची पँकेट कि.अं असे एकुण 6106.17 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हे सर्व साहित्य कशासाठी जवळ बाळगले आहेत याबाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलीसांनी त्यांना विश्वासात घेवुन विचारले असता, आम्ही अ. ब. क.1 बार्शी हिस, सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरने स्त्री जातीचा गर्भ असल्याचे सांगितल्याने, आम्ही तीचा गर्भपात करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी तीला आणले असुन, तीला आम्ही गर्भपाताच्या गोळ्या दिल्या असल्याचे सांगितले. त्यावेळी सदर त्यांचे ताब्यात मिळुन आलेले औषधे, गोळ्या व इतर वस्तु या पोलीस उपनिरिक्षक गजानन कर्णेवाड यांनी दोन पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतले आहे.

त्यानंतर सदर महिला अ. ब. क.1 बार्शी हिने पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तीला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुगाणालय बार्शी येथे 108 अँब्युलन्सने तीचे आईसह पाठवण्यात आले. ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे जाताच सदर महिला अ. ब. क.1 हिचा गर्भपात झाला असुन ते स्त्री जातीचे भ्रुण आहे. सदरचे भ्रुण अंदाजे 3.5 ते 4 महिण्याचे असुन त्याचे वजन 150ग्रँम व लांबी 11.5 से.मी असुन ते मयत आहे. सदर महिलेला तीचे आई व भ्रुणासह पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सोलापुर येथे 108 अँब्युलन्सने पाठविण्यात आले आहे.

सदर महिलेचा गर्भपात हा काही वेळापुर्वी दिलेल्या गोळ्यांमुळे झालेला आहे. त्यानंतर त्याठिकाणी असणाऱ्या दोन महिला 1) सुषमा किशोर गायकवाड, वय 40 वर्षे, धंदा- नर्सींग, रा. ताडसौदने रोड, बार्शी 2) उमा बाबुराव सरवदे, वय 50 वर्षे, धंदा- आया/मावशी, रा. हिरेमठ हॉस्पीटल, बार्शी यांना पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, त्यांनी सांगितलेली माहिती अशी की, आम्ही सुमारे सहा महिण्यापासुन सदर गर्भपाताचे काम करत आहेत. आम्ही एजंट दादा सुर्वे, रा. कुर्डुवाडी याने आत्तापर्यंत पाठविलेल्या पंधरा ते वीस, एजंट सोनु भोसले, रा. शेटफळ याने पाठवलेले पाच ते सात व एजंट सुनिता जाधव, रा. बार्शी यांनी पाठविलेले चार ते पाच गर्भवती महिलांचा गर्भपात केला आहे. आमच्या बरोबर नंदा गायकवाड, रा. बार्शी हिने देखील आम्हाला गर्भपात करणेसाठी मदत केली आहे. तसेच गर्भपात करणेसाठी आवश्यक असणाऱ्या गोळ्यांवर बंदी असल्याने आम्ही राहुल बळीराम थोरात, रा. बार्शी याच्याकडुन त्या गोळ्या लपुन घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावरुन 1) सुषमा किशोर गायकवाड, वय 40 वर्ष, धंदा- नर्सींग, रा. ताडसौदने रोड, बार्शी 2) उमा बाबुराव सरवदे, वय 50 वर्ष, धंदा- आया/मावशी, रा. हिरेमठ हॉस्पीटल, बार्शी 3) नंदा गायकवाड, रा. बार्शी, ता. बार्शी, यांनी एजंट 4) दादा सुर्वे, रा. कुर्डुवाडी 5)सोनु भोसले, रा. शेटफळ 6) सुनिता जाधव, रा. बार्शी यांच्या मार्फत तसेच 7) राहुल बळीराम थोरात, रा. बार्शी 8) सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टर (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या मदतीने वैदयकिय गर्भपात (सुधारित) कायदा 2002 प्रमाणे गर्भपात हा नोंदणीकृत डॉक्टरांकडुन व राज्य वैदयकिय नोंदणी पुस्तकात नोंद असलेल्या वैदयकिय व्यवसायीकाकडुन, सरकारने स्थापन केलेल्या दवाखाण्यात किंवा शासनाने मान्यता दिलेल्या दवाखाण्यात ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया कक्ष, स्त्री चिकीत्सेसाठी लागणारे टेबल, भुल देण्यासाठी व पुन्हा शुद्दीवर आणण्यासाठी लागणारी साधने, निर्जंतुकीकरणासाठी लागणारी साधणे, आपत्कालीन औषधे व औषधी द्रवे, गरज पडल्यास वाहतुकीची व रक्त देण्याची सोय, उपलब्ध आहे. अशाच ठिकाणी प्रसुती शास्त्रातील पात्रता व अनुभव असणाऱ्या वैदयकिय अधिकारी यांनीच करणे आवश्यक असताना देखील, वरील इसमांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता गर्भपात करण्याची तीची वैदयकीय पात्रता नसताना तसेच गर्भपात करण्यासाठी मान्यता प्राप्त ठिकाण नसताना सदर महिलेचे गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान करुन ते स्त्री जातीचे भ्रुण असल्याने त्याचा बेकायदेशीररित्या गर्भपात केला आहे.

म्हणुन डॉ चारुदत्त सिद्धेश्वर शितोळे यांच्या फिर्यादी वरून वरील आरोपींच्या विरुध्द भादवी कलम 313, 315, 316, 34 व गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान तंत्र कायदा 1994 चे कलम 4, 5 (2) (3 (4), 6 प्रमाणे बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड करत आहेत.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!