बार्शी पोलिसांकडून बनावट नोटांचे रॅकेट उद्धवस्त, 5 लाख रुपयांच्या नोटांसह आरोपीस अटक

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी शहर पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी!
बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा पर्दाफास : 5 लाख रुपयांच्या नोटांसह आरोपीस अटक
बार्शी, १९/०७/२०२३ रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार तेलगिरणी चौक बार्शी येथे दोन इसम बनावट नोटा या मिरगणे कॉम्प्लेक्स मधील गाळयामध्ये व्यापारी यांच्याकडे खपवण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहीती बार्शी शहर पोलिसांना मिळाली होती. बार्शी शहर पोलीस ठाणेचे पो. अधिकारी व पो अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन त्या दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांची नावे सुनिल चंद्रसेन कोथिंबिरे वय २३ रा.माळी नगर अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि. बीड, आदित्य धनजंय सातभाई वय. २२ रा. स्टेशन रोड गांधी मार्केट परळी वैजीनाथ ता. परळी जि. बीड अशी असल्याचे सांगितले.

त्यांच्याकडे २००० / रू. च्या बनावट नोटा मिळुन आल्या त्यामुळे त्याच्या विरुध्द बार्शी शहर पोलीस ठाणेस बनावट नोटा बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता त्याची इतर दोन साथीदार ,खदिर जमाल शेख वय ३१ रा. मिरवट ता. परळी जि. बीड विजय सुधाकर वाघमारे वय. ३२ रा. स्टेशन रोड गांधी मार्केट परळी ता. परळी जि. बीड हे मिळुन आले व त्याच्याकडे ६,०००/- रू.च्या बनावट नोटा मिळुन आल्याने त्यांना गुन्हयात अटक केली व त्याच्याकडे तपास केला असता सदरच्या नोटा हया ,नितिन उर्फे आप्पा जगन्नाथ बगाडे वय. ५० रा. शामगाव ता. क-हाड जि. सातारा -जमिर मोहमंद सय्यद वय.४० रा. नाशिकरोड सिन्नर फाटा नाशिक ता. जि. नाशिक. यांच्याकडुन घेतल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले असता सदरच्या नोटा ,ललित चंद्रशेखर व्होरा वय. ३६ रा. चिंचोली काटी ता. मोहोळ जि.सोलापुर हा घरी तयार करत असल्याचे सांगितल्याने त्याचे घरी छापा टाकला असता त्याच्याकडे बनावट ८०,०००/- रू. नोटा, एच. पी. कलर प्रिंटर, कटर, पट्टी, कागदावर बनवलेल्या अर्धवट नोटा तसेच इतर नोटा बनवण्याचे साहित्य मिळुन आले. बनावट दिड लाख रूपये व कागदावर बनवलेल्या नोटा तिन ते चार लाख रूपयाच्या अर्धवट नोटा मिळुन आलेल्या आहेत.

सदर गुन्हयाचा तपास तपास चालु असुन आतापर्यत ०७ आरोपीना अटक केलेली आहे.सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी जालिंदर नालकुल, बार्शी शहर पोलीस ठाणे संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणेचे सपोनि. ज्ञानेश्वर उदार, सपोफौ. अजित वरपे, पोहेकॉ. रेवन्नाथ भोंग, पो. ना. अमोल माने, श्रीमंत खराडे, मनिष पवार, वैभव ठेंगल, पो.कॉ. अविनाश पवार, सचिन देशमुख, अर्जुन गोसावी, रवि लगदिवे, ज्ञानेश्वर घोंगडे, रामेश्वर मस्के, अंकुश जाधव, उत्तरेश्वर घुले व सायबर पोलीस ठाणेचे पो.कॉ. रतन जाधव यांनी बजावलेली आहे. तरी बनावट नोटा बाबत नागरीकांना काही मिळाल्यास तात्काळ बार्शी शहर ठाणेस कळवावे.असे आवाहन बार्शी पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!