स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी शहाजी चंदनशिवे.
परंडा- दि . 22 जुलै 2023 प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना संस्थेची दारे सदैव उघडी असणार आहेत केवळ त्यांनी आपली दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी विद्यार्थ्यांचे हित जपावे महाविद्यालयात गुणवत्ता चांगल्या पद्धतीने निर्माण करावी असे मत श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा दत्तात्रय मांगले यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात शुभेच्छा देताना व्यक्त केले .ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . प्रा दत्तात्रय मांगले हे 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत . त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव तर व्यासपीठावर श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे , सचिव संजय निंबाळकर , कनिष्ठ विभागाचे नवनियुक्त पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख , उपप्राचार्य प्रा डॉ महेश कुमार माने आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील उपस्थित होते .
यावेळी प्रा तानाजी फरतडे , प्रा दीपक हुके , प्रा उत्तम कोकाटे , प्रा विजय जाधव , प्रा डॉ शहाजी चंदनशिवे , प्रा डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांनी आपली मनोगत व्यक्त केली . याप्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच 1977 ते 1999 या कालावधीमधील माजी विद्यार्थी तसेच बावची विद्यालय महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक शहरातील तसेच तालुक्यातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पुढे बोलताना संजय निंबाळकर म्हणाले की प्रा दत्तात्रेय मांगले यांनी 28 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली आहे . महाविद्यालयातील प्रशासकीय कामांमध्ये मदत केली आहे . तेव्हा त्यांच्या या कामाची स्तुती करत ज्या ज्या वेळेस संस्थेला गरज भासेल त्या त्या वेळेस आम्ही तुम्हाला आमंत्रित करू आपण याल अशी अपेक्षा व्यक्त केली .सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक दत्तात्रेय मांगले म्हणाले की मी विद्यार्थ्यांचे हित जपत आणि संस्थेचे हित पाहत मी माझी दिलेली जबाबदारी पूर्ण केली आहे . विद्यार्थ्यांनी शिकावे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण व्हावी हे ध्येय समोर ठेवून मी माझी सेवा पूर्ण केली आहे . संस्थेने मला खूप मोठी संधी दिली त्या संधीचं सोनं मी विद्यार्थ्यांचे हित समोर पाहून केले आहे .मी कार्यालयीन मदत करत असताना मला कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने , वरिष्ठ लिपिक बाबासाहेब शिरसागर यांचे वेळोवेळी मदत घ्यावी लागली त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली त्यामुळे मी सर्व कामव्यवस्थितपणे करू शकलो व पुढेही करेल असे त्यांनी आपल्या सत्कारला उत्तर देताना आश्वासन दिले . शेवटी अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला . त्यांनी आपल्या अध्यक्ष समारोप भाषणामध्ये सांगितले की मांगले सर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते . त्यांचे आपल्या विषयावरती प्रभुत्व होते . त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केले आहे . तेव्हा त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .सरांच्या ज्ञानदानामुळे सरांनी घडवलेले मुलं आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हीच त्यांची खरी ओळख आहे .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा किरण देशमुख यांनी केले .सूत्रसंचालन प्रा संभाजी धनवे यांनी केले तर आभार प्रा डॉ महेश कुमार माने यांनी मानले . कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.