मोरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा येथे व्यसनमुक्ती केंद्र कार्यान्वीत .

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .


परंडा :- दिनांक 22 जुलै 2023. माऊली छाया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परंडा यांच्या अंतर्गत डॉक्टर आनंद मोरे एमडी आयुर्वेद मेडिसिन यांना मोरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा येथे व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे . डॉक्टर आनंद मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या मते सद्यस्थितीमध्ये व्यसनाधीनता ही अत्यंत ज्वलंत सामाजिक समस्या उग्ररुप धारण करताना दिसत आहे . बहुतेकांचा भारतीय संस्कृती आणि निसर्गाचा संबंध तुटत चालला आसुन ,आधुनिकांचे अंधानुकरण करत क्षणिक सुखाच्या मागे धावताना समाजातील नवी पिढी दिसत आहे . आदर्श नैसर्गिक दिनचर्या , ऋतुचर्या ,सदाचार , अध्यात्मिक आत्म उन्नतीची बाजू याचे ज्ञान विशेषतः बाल व तरुण वयामध्ये कमी होताना दिसत आहेत . त्यामुळे जीवनात यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम ,मेहनत ,जिद्द, चिकाटी प्रामाणिकपणा आदी गोष्टींचा लय होऊन शॉर्टकट द्वारे झटपट मोठे होण्याची स्वप्ने तरुण पिढी पाहत आहेत . सध्याची वाढती लोकसंख्या व प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा यामुळे समाजामध्ये नैतिकता ढासळत जाऊन ताणतणाव आदी कारणामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे . व्यसनाधीनतेमध्ये केवळ अमली पदार्थांचेच नाही तर इंटरनेटवरील काही अयोग्य साईट, पब्जी / जंगली स्मी विविध गेम, सोशल मीडिया, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या गोष्टींचा अधिक अयोग्य पद्धतीने वापर वाढत चाललेला दिसतो आहे . या प्रकारामध्ये विशेषता किशोरवयीन व तरुण पिढी अधिक गुंतत जाऊन त्यांचा वेळ ,पैसा ,शरीर मानसिक श्रम, खर्च होताना दिसत आहे . अमली पदार्थ यामध्ये दारू, तंबाखू ,गुटखा ,गांजा, मावा, ड्रग्स आदींची लत- सवय ही अयोग्य संगतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये लागल्याने त्यांचे जीवन बरबाद होताना दिसत आहे . यात केवळ त्या व्यक्तीचे आयुष्याची हानी अधोगती होत नसून त्यांच्यावर अवलंबून असणारी कुटुंब व्यवस्था ,समाज व्यवस्था ,पर्यायाने देशाची प्रगती खुंटत चाललेली आहे . त्यामुळे अशा अयोग्य मार्गाने , अज्ञानामुळे व्यसनांच्या विळख्यात सापडलेल्या सर्वच थरातील व्यक्तींना एका जबाबदार कुटुंब व समाज व्यवस्थेची गरज आहे . अशा व्यक्तींना योग्य काय ,अयोग्य काय, हितकर काय, अहितकर काय, चांगले वाईट इत्यादी गोष्टींचे संस्कारी मार्गदर्शन करणे काळाची गरज बनलेली आहे आणि हीच सामाजिक ज्वलंत सद्य परिस्थीतीतील समस्येवरील रामबाण उपाय आहे . याचसाठी आम्ही सामाजिक जबाबदारी, ऋण याचे भान ठेवून माऊली छाया बउद्देशीय सेवा भावी संस्था , परंडा याच्या अंतर्गत व्यसनमुक्ती केंद्र याची स्थापना केलेली आहे . यासाठी आमच्याकडे स्वतःची बिल्डिंग, योग, मेडिटेशन साठी हॉल उपलब्ध आहे . अशा गरजू व्यक्तींना व पंचक्रोशीतील आजूबाजूंच्या तरुण पिढीला व्यायाम शाळा / जिम / अध्यात्मीक नैसर्गीक जीवनचर्या असणे महत्वाचे आहे . त्यामुळे शारीरिक मानसिक स्वास्थ्य ,प्रसन्नता निर्माण करून आत्मविश्वास वाढण्यास योग्य सकारात्मक जीवक्रम निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक / जीवनावश्यक आहे . त्यासाठी आद्ययावत सोई उपलब्ध करण्याचा आमचा माणस आहे . या अगोदर सुद्धा विविध माध्यमातून आम्ही स्वतः संघर्ष करत प्रतिकुलतेवर मात करत सामाजिक प्रश्नांवर कृतिशील पणे , करूणामय कार्य करत प्रत्येक व्यक्तीला आत्मभान ,समाजभान, राष्ट्रभान निर्माण होण्यासाठी सर्वतो प्रयत्न केलेले आहेत .प्रत्येक गरजू शेवटच्या घटकाला स्व स्वरूपाची जाणीव निर्माण करून देत त्याला आत्मशोध , आत्मबोध घेत आत्मकल्याण यासह विश्वकल्याणासाठी त्याची व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे . तरी परंडा पंचक्रोशीतील जनता जनार्दनांना विनंती या संधीचा आपल्या आप्तगन मित्रपरिवारांसाठी वापर करून घ्यावा . धन्यवाद !
कळवे ,
आपला नम्र ,
डॉ . आनंद गोरख मोरे , एम डी .
मोरे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल , परंडा
अध्यक्ष , माऊली छाया बउद्देशीय सेवा भावी संस्था , परंडा
मो .नं – 9423066291 , 9665639009. drandymore@gmail.com .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!