पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- शुक्रवार दि.२१ जुलै २०२३ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकारणीत जनतेत स्थान असणाऱ्या नेत्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीकोनातून शहराच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची दिनांक २० रोजी नियुक्ती करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुनील तटकरे यांनी भोंडवे यांना निवडीचे पत्र दिले. पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अधिका अधिक मजबूत राहावा या दृष्टिकोनातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या नेत्यांना कार्यकारणी सामावून घेण्यात येत आहे. त्याच भूमिकेतून बुधवार दिनांक १८ रोजी अध्यक्षसह पाच कार्याध्यक्ष यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले. आहेत त्यानंतर आज मोरेश्वर भोंडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोरेश्वर भोंडवे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असून चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांचे मोठे वलय आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासोबतच येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर सक्षम आणि जनतेमध्ये स्थान असणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादीकडून कार्यकारणीमध्ये स्थान देण्यात येत आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.