www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद,दि.20जुलै 2023:-उस्मानाबाद जिल्हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुनील शिरापुरे, जिल्हा समन्वयक तेल उद्योग अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यात शिधापत्रिकांचे वितरण, आधार सिडींग, मोबाईल सिडींग, पेट्रोल पंप बाबतची माहिती धान्य उचल व वाटप तसेच जिल्ह्यातील तालुका निहाय रास्त भाव दुकान गॅस एजन्सी पेट्रोल पंप परवानाधारक याबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी श्री. शिंदे म्हणाले सर्व स्वस्त: धान्य दुकानदारांची आढावा बैठक घेऊन अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रीका अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी त्वरीत हस्तगत करुन उर्वरित पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रीका देण्याची कारवाई प्राधान्याने करावी. तसेच शेतकऱ्यांना डी.बी.टी.द्वारे थेट लाभ हस्तांतरणात खाते क्रं. अप्राप्त असणाऱ्या शिधा पत्रीका धारकांकडुन कुटुंबातील महिला सदस्यांचे खाते क्रंमांक हस्तगत करणेबाबत सर्व तहसीलदारांमार्फत स्वस्त धान्य दुकानदार व तलाठी यांना बैठकांतुन आवाहन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना जिल्हातील विकास कार्यकारी सोसायटीच्या नावे असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाबाबत वेळोवेळी तपासणी करण्याच्या सुचना ही देण्यात आल्या.
आधार सिडींग बाबत केवळ उमरगा व वाशी यांनी शंभर टक्के इष्टांक पुर्ण केले असुन उर्वरित सर्व तालुक्यांनी व्यापक सर्वेक्षण करुन संबंधित कुटुंब प्रमुख मयत असल्यास त्याची नावे वगळण्याची कारवाई करावी तसेच सर्व दुकानदारांचा मोबाई सिडींग बाबत आढावा घेऊन काम पुर्ण करावे. तसेच जिल्हयातील सर्व तृतीय पंथीयांची संबंधित संस्थेकडुन माहिती घेऊन त्यांना शिधापत्रीका देण्याची कारवाई प्राधान्याने करावी असे निर्देश ही अप्पर जिल्हयाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
उस्मानाबाद जिल्हयातील १३९ पेट्रोल पंपावर मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध आहे किंवा कसे याची खात्री करुन आवश्यक कारवाई करावी अशी सुचनाही श्री शिंदे यांनी तेल उद्योग जिल्हा समन्वयक यांना केली.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.