पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- गुरुवार दि.२०जुलै२०२३ पिंपळे सौदागर येथे गुरुवारी दिनांक २० पहाटे कुणाल आयकॉन रोडवरील छत्रपती चौकातील नवीन बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी भूस्खलन होत रस्ता खचला आहे. पहाटेच्या वेळी ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या घटनेमुळे रस्त्यात असलेले पाणी पुरवठा लाईन व स्क्रीन वॉटर लाईन देखील तुटलेली आहे. पहाटे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी या परिसरातील सोसायटीमधील नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी तात्काळ महापालिका अधिकारी, पाणीपुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाला कळवले त्यानुसार पोलीस व महापालिका विभाग घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी बॅरिकेट केले असून महापालिका आपत्कालीन विभाग, पाणीपुरवठा विभागातर्फे पाईपलाईन व दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत.



www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.