www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद,दि,20जुलै 2023:- सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहे आणि पावसाळया मध्ये अनेक आजार व साथरोग उद्भवतात तसेच पावसाळयामध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांमुळे आरोग्यावर परिणाम होतात. तसेच पावसाळयात होणाऱ्या आजारापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत पावसाळयात होणारे किटकजन्य आजार टाळण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असून पावसाळयात किटक जन्य आजाराबाबत काळजी घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी सांगितले.
जिल्हयातील नागरिकांना पावसाळयात आरोग्य जपण्यासाठी सल्ला आरोग्य विभागाकडून दिला. मान्सून मध्ये साथरोगाची स्थिती असल्याने हिवताप विभाग यंत्रणा त्या दृष्टीने सज्ज आहे. उस्मानाबाद जिल्हयातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि उपकेंद्रामध्ये व सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये साथरोग बाबत दक्ष राहण्याच्या सुचना आरोग्य विभागाने दिले आहेत.
कुठल्याही आजाराची साथ असल्यास त्याबाबत तात्काळ वैद्यकिय अधिकारी यांना संपर्क करावा. तसेच त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हयातील नदीकाठच्या अतिसंवेदनशिल गावात विशेष लक्ष देण्यात येत आहे. ग्रामपंचायत मार्फत गावातील नाल्या, गटार तुंबलेले नाल्या, वाहते करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय गावात परिसर स्वच्छता नियमित साफसफाई ठेवण्यात यावी याविषयी सांगितले व आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत आरोग्य शिक्षण दिले जात आहे. तसेच पावसाळयात किटकजन्य आजार डेंग्यू, हिवताप, मलेरिया, जापनिज इन्फाल्यटीज यासांरखे आजार उदभवू शकतात. हे आजार उदभवू नये यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत जिल्हयातील सर्व गावात वाडया, वस्त्या, तांडे येथे जाऊन किटक शास्त्रीय सर्वेक्षण, आबेटिंग केले जात आहे. तसेच घरोघरी साथरोग बाबत आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. जलद ताप सर्वेक्षण, किटक शास्त्रीय सर्वेक्षण, जीवशास्त्रीय उपाययोजना तसेच ज्या ग्रामपंचायत मार्फत धूर फवारणी करण्यात येत आहे.
घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारती मधील पाण्याची टाकी स्वच्छ करुन घ्यावी. पाईप लाईन मध्ये गळती होत असल्यास त्वरीत पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे. शक्य असल्यास फिल्टर पाणी प्यावे. शिळे व उघडया वर चे अन्न खाऊ नये. गच्ची वरील व घराच्या परिसरातील भंगार साहित्य रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डब्बे, उघडया वरील टायर्स नष्ट करावे. फुलदाण्या ट्रे, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी साठविण्याच्या टाक्या/ड्रम/भांडी आठवडयातून एकदा त्यामधील संपुर्ण पाणी काढून पुर्णपणे कोरडे करावे. शक्य असल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा वापर करावा. आपले घर कार्यालय व परिसरात पाणी साचू न देण्याची काळजी घ्यावी.
यासाठी खालील काळजी घेण्यात यावे: संडासच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे.घरातील टायर, भंगार सामान निकामी डब्बे, बाटल्या, प्लॅस्टिक साहित्य यांची विल्हेवाट लावणे. घरातील कुलर, फुलदाण्या वेळीच स्वच्छ करुन कोरडे ठेवणे. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. डासांच्या चावा पासून व्यक्तिगत संरक्षणा साठी किटक नाशक भारित मच्छरदाणीचा वापर करावा. झोपताना डास प्रतिबंधात्मक क्रीम अगरबत्ती यांचा वापर करावा. घराचे दारे, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळया बसविणे. गावात गावाच्या बाजुला पाण्याची डबके साठलेले असते यामध्ये आईल किंवा रॉकेल टाकण्यात यावे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.